शिक्षण

आरटीई’साठी नाशिक जिल्ह्यातील ४ हजार १४ शाळांमध्ये ५३ हजार ४०४ जागा

बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिनीयमांतर्गत (आरटीई) (RTE) सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांत १ हजार २५२ अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील ४ हजार १४ शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असून, यामध्ये ‘आरटीई’च्या ५३ हजार ४०४ जागा उपलब्ध आहेत. यंदापासून ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेच्या नियमात सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया राबविताना खासगी विनाअनुदानित शाळेच्या एक किमी परिसरात स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा (जिप किंवा महापालिका) असल्यास बालकांना खासगी शाळांमध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.(53,404 seats in 4,014 schools in Nashik district for RTE)

त्यामुळे यंदा महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांचाही या प्रक्रियेत समावेश झाला असून, या शाळांमध्ये प्राधान्याने ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. परिणामी यंदा राज्यासह नाशिक जिल्ह्यातील आरटीई पात्र शाळांमध्ये जवळपास १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यंदा नाशिक जिल्ह्यात ४ हजार १४ आरटीई पात्र शाळा असून, यामध्ये ५३ हजार ४०४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यासाठी अर्ज दाखल करण्यास १६ एप्रिलपासूप्रवेशाच्या नियमात सुधारणा करण्याच्या प्रक्रियेमुळे यंदा शिक्षण विभागामार्फत दोन महिने उशिरा आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात सुरू होणारी शाळा नोंदणी व विद्यार्थी अर्ज प्रक्रिया यामुळे लांबणीवर पडली असून, एप्रिल-मे पर्यंत ही अर्ज प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर लॉटरी, निवड यादीतील प्रवेश व प्रतीक्षा यादीतील प्रवेश या क्रमाने ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.न सुरुवात झाली असून, दोनच दिवसात १ हजार २५२ अर्ज या प्रवेशासाठी दाखल झाले आहेत. ३० एप्रिलपर्यंत पालकांना या जागांवरील प्रवेशासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.दोनच दिवसात १ हजार २५२ अर्ज या प्रवेशासाठी दाखल झाले आहेत. ३० एप्रिलपर्यंत पालकांना या जागांवरील प्रवेशासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

प्रवेशाच्या नियमात सुधारणा करण्याच्या प्रक्रियेमुळे यंदा शिक्षण विभागामार्फत दोन महिने उशिरा आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात सुरू होणारी शाळा नोंदणी व विद्यार्थी अर्ज प्रक्रिया यामुळे लांबणीवर पडली असून, एप्रिल-मे पर्यंत ही अर्ज प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर लॉटरी, निवड यादीतील प्रवेश व प्रतीक्षा यादीतील प्रवेश या क्रमाने ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

टीम लय भारी

Recent Posts

पंकजा मुंडेंची लढाई जातीयवादाच्या पेचात

बीडची निवडणुक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जातियतेला धरून अधिक अशीच आता होताना दिसतेय. आरक्षण…

22 mins ago

४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा

उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde)…

22 mins ago

नाशिक इंदिरानगर येथे वॉशिंग मशिनमध्ये ठेवलेले दागिन्यांची चोरी

इंदिरानगरमध्ये (Indiranagar) चोरट्याने चक्क वॉशिंग मशिनमध्ये (washing machine) लपवून ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने (Jewellery…

49 mins ago

३० मेपर्यंत खोदलेले रस्ते दुरुस्ती न झाल्यास महापालिका नेमकी कोणावर कारवाई करणार?

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून (MNGL) घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरवण्याच्या प्रकल्पासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदले (roads…

1 hour ago

दीड लाखांची लाच घेताना पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात

राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे संचालक (State Director of Archaeology) संशयित डॉ. तेजस मदन गर्गे…

2 hours ago

100 कोटींच्या TDR घोटाळा अहवालात दडलय काय? 2 वर्षे उलटूनही गुप्तता कायम

महापालिका हद्दीतील व देवळाली शिवारातील टीडीआर (TDR) घोटाळ्याचा तपास केल्यानंतर महापालिकेने त्याचा गोपनीय अहवाल दोन…

2 hours ago