Privacy Policy

आमच्या LayBhari.in संकेतस्थळावर आपले स्वागत. आमच्या संकेतस्थळाला भेट देताना आपण निश्चिंत मनाने वाचनाचा निखळ आनंद घेऊ शकता. कारण कोणत्याही वाचकांच्या खासगी गोष्टींमध्ये आम्ही लक्ष देत नाही. किंबहूना भेट देणाऱ्या वाचकांचे खासगीपण आम्ही जपतो.

तुमच्या इच्छेविरूद्ध तुमच्याविषयीची कोणतीही खासगी माहिती आम्ही आमच्याकडे ठेवत नाही. आपण आमच्या संकेतस्थळावरील काही माहिती डाऊनलोड केली, किंवा त्याचा संदर्भ म्हणून वापर केला तर तुमचा खासगी तपशिल आम्ही जमा करून ठेवत नाही.

तुमच्या सारख्या किती वाचकांनी संकेतस्थळावर भेट दिली, कोणता मजकूर वाचला, तुम्ही कोणते ब्राऊजर वापरले, इंटरनेट सेवा कोणत्या कंपनीची घेता, आपण डेस्कटॉपवर आमच्या संकेतस्थळाला भेट दिली आहे, की मोबाईलवरून याबाबतची ढोबळ माहिती स्वयंचलितपणे आमच्याकडे जमा होत असते. त्यातून आम्ही अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत असतो. पण तुमच्या इच्छेशिवाय व्यक्तिगत स्वरूपाची कोणतीही माहिती आम्ही जमा करीत नाही. तुमचे खासगीपण जपणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.

व्यक्तिगत माहिती

आम्ही स्वतःहून तुमची कोणतीही माहिती जमा करीत नाही. परंतु आमच्या बातम्या मिळविणे, अथवा तत्सम हेतूच्या दृष्टीने तुम्ही स्वतःहून माहिती दिली तरच ती आमच्याकडे असते. यामध्ये तुमचे नाव, ई – मेल आयडी, तुमच्या आवडीचे विषय इत्यादी माहिती आमच्याकडे असू शकते. या माहितीच्या आधारे तुम्हाला बातम्या पाठविणे, प्रतिक्रिया व्यक्त करणे अशा कारणांसाठीच वापर केला जाऊ शकतो. तुम्ही दिलेली ही माहिती आम्ही अन्य कुणालाही पुरवत नाही.

त्रयस्थ संकेतस्थळांच्या धोरणाबाबत

आमच्या संकेतस्थळावरील मजकुरामध्ये अन्य संकेतस्थळाच्या लिंक दिलेल्या असतात. पण खासगीपणाबद्दल त्या संकेतस्थळाचे धोरण हे वेगळे असू शकते. त्यांचे धोरण काय आहे हे आपण त्यांच्या संकेतस्थळाला भेट देऊन तपासू शकतात. त्यांच्या धोरणांशी आम्ही सहमत नाही.

आमच्या संकेतस्थळावर नामांकित थर्ड पार्टी संस्थेच्या जाहिराती प्रसिद्ध होत असतात. जाहिराती देताना या संस्था तुमच्या ब्राऊजरवर कुकीज ठेवू शकतात. या संस्था तुमचे ई-मेल, नाव, पत्ता अशा प्रकारची माहिती जमा करू शकतात. तुमची आवड – निवड, तुमच्या सवयी याबाबत त्या संस्था माहिती जमा करू शकतात. या माध्यमातून त्या संस्था विविध उत्पादनांच्या जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतात. या थर्ड पार्टी संस्थांवर आमचा कोणताही अंकुश नाही.

तक्रारींबाबत

तुमचा खासगीपणा जपण्याबाबतचे उल्लंघन झाल्यास तुम्ही आमच्याकडे तक्रार करू शकता. योग्य तक्रारीचे निश्चितपणे निराकरण केले जाईल. त्यासाठी खाली नमूद केलेल्या ग्रिव्हीयन्स ऑफिसरकडे आपण लिखीत अथवा  [email protected]  या ईमेलवर स्वाक्षरीसह तक्रार पाठवू शकता.

सौ. आश्विनी खरात (ग्रिव्हियन्स ऑफिसर)

02/ 7A, राजमाता सोसायटी,

कन्नमवार नगर नं. 02, विक्रोळी,

मुंबई नं. 400083

तक्रारीमध्ये खालील माहितीचा समावेश असावा

  1. तक्रारदाराचे नाव, पत्ता, ई- मेल आयडी, मोबाईल क्रमांक
  2. संबंधित मजकुराचे हेडींग, दिनांक, बातमीची लिंक, तक्रारीचा विषय इत्यादी
  3. माहिती व्यक्तीगत अथवा सामाजिक / धार्मिक संवेदनशील आहे याचा स्पष्ट उल्लेख असावा
  4. तक्रारीसाठी जोडलेल्या पुरावे, कागदपत्रे यांची माहिती द्यावी
  5. तुम्ही जोडलेली माहिती, पुरावे हे अलिकडच्या काळातील असून ती खोटी नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
  6. आपली तक्रार व सोबतची माहिती बिनचूक असली पाहिजे.
  7. आमच्या गोपनियतेच्या धोरणाबाबत आपणांस काही आक्षेप अथवा शंका असल्यास आपण आम्हाला वरील संपर्क माहितीच्या आधार संपर्क साधू शकता
  8. वर नियुक्त केलेल्या व्यक्तीशीच आपण वरील संपर्क माहितीच्या माध्यमातून संपर्क साधावा. अन्य व्यक्तीच्या माध्यमातून साधलेला संपर्क आम्ही ग्राह्य धरणार नाही.