शिक्षण

Yearly Calender : आधीच्या कॅलेंडरमध्ये केवळ 10 महिने होते! जाणून घ्या महिन्यांच्या नावामागील दडलेले रहस्य

दिवस निघून जातात, मग महिने, वर्षे आणि असेच पुढे जातात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या महिन्यांची नावे कशी ठेवली गेली? त्यांची नावे कशाच्या आधारावर ठेवली असतील? दर महिन्याला नामकरण करण्यामागे एक खास कारणही आहे. आज कॅलेंडरमध्ये जिथे जानेवारी हा पहिला महिना आहे, जुन्या काळात वर्ष मार्चपासून सुरू होत असे. मार्चला पहिल्या महिन्याचा दर्जा होता. यामागेही काही खास कारणे होती. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला या महिन्यांची नावे कशी ठेवली हे सांगणार आहोत, जे जाणून घेणे तुमच्यासाठी खरोखर मनोरंजक असेल.

मार्च: प्राचीन रोमन लोकांनी वर्षभर चाललेल्या युद्धानंतर हिवाळ्यात दोन महिने विश्रांती घेतली आणि मार्चमध्ये युद्ध पुन्हा सुरू झाले. रोमन युद्धाच्या देवता मार्सच्या नावावरून या महिन्याचे नाव मार्च ठेवण्यात आले. आणि युद्दाला या महिन्यापासून पुन्हा सुरुवात झाल्यामुळे मार्च महिन्याला पहिल्या महिन्याचा दर्जा देण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

Mulayam Singh Yadav : मुलायम सिंह यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट आली समोर; रुग्णालयाने जारी केले मेडिकल बुलेटिन

Womens Special : हील्स वापरल्यामुळे पायदुखीचा त्रास होतोय? ‘या’ आहेत काही खास टीप्स

Hrithik Roshan Video : गरबा क्विन फाल्गुनी पाठकसोबत हृतिकचा शानदार गरबा पाहिलात का?

एप्रिल: असे म्हटले जाते की लॅटिन भाषेतील ‘अदर’साठी वापरल्या जाणार्‍या शब्दाच्या आधारे एप्रिलचे नाव देण्यात आले आहे, परंतु याशिवाय एप्रिल महिन्याचे नाव ‘एपेरीर’ या शब्दावरून पडले आहे, असेही म्हटले जाते.

मे : या महिन्याचे नाव रोमन देवी ‘माया’ या नावावरून पडले आहे. माया ही देवी आहे जी वनस्पती आणि पिके वाढवते.

जून : रोमन काळात जून महिना हा विवाहासाठी सर्वात शुभ मानला जात असे. त्यामुळे या महिन्याचे नाव लग्नाच्या देवतेच्या ‘जुनो’ नावावरून ठेवण्यात आले.

जुलै: जुलैला प्रथम ‘क्विंटिलीस’ (पाचवा) म्हटले जाते परंतु 44 ईसापूर्व ज्युलियस सीझरच्या नावावरून जुलै असे नाव देण्यात आले.

ऑगस्ट: इ.स.पूर्व ५०० मध्ये राजा ऑगस्टस सीझर याच्या नावावरून या महिन्याचे नाव ‘ऑगस्ट’ ठेवण्यात आले. पूर्वी त्याला ‘सेक्स्टिलिया’ (सहावा) असे म्हणायचे.

सप्टेंबर: या महिन्याचे नाव लॅटिन शब्द ‘सेप्टम’ वरून आले आहे, ज्याचा अर्थ सातवा आहे.

ऑक्टोबर: या महिन्याचे नाव ‘ऑक्टा’ या लॅटिन शब्दावरून ऑक्टोबर असे ठेवले गेले. ऑक्टो म्हणजे आठवा.

नोव्हेंबर: नोव्हेंबर हा सब्द सरळ सोपा आहे. ज्याचा अर्थ म्हणजे नववी. रोमन कॅलेंडरमध्ये हा नववा महिना होता.

डिसेंबर: कॅलेंडरचा शेवटचा आणि दहावा महिना, डिसेंबरला लॅटिन डेका म्हणजे दहा नावावरून नाव देण्यात आले आहे.

फेब्रुवारी: पोम्पिलियस 690 इ.स.पू मार्चपूर्वी साजरा होणारा ‘फेब्रुआ’ हा सण ओळखण्यासाठी त्या महिन्याला फेब्रुवारी असे नाव देण्यात आले.

जानेवारी: जानेवारी नंतर रोमन कॅलेंडरमध्ये वर्षाचा शेवटचा महिना बनला. शेवट आणि सुरुवातीचा देव जॅनस याच्या नावावरून या महिन्याचे नाव जानेवारी ठेवण्यात आले.

दरम्यान, इ.स पूर्व 690च्या आधी वार्षिक कॅलेंडरमध्ये केवळ 10 महिन्यांचाच समावेश होता. त्यानंतर कालांतराने फेब्रुवारी आणि मग जानेवारी या दोन महिन्यांचा समावेश करण्यात आला आणि त्याचे नामकरण करण्यात आले.

प्रणव ढमाले

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

21 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago