व्यापार-पैसा

मार्च एंड’मुळे रखडली ७ लाख जणांची पेन्शन, ५ तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता

राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात यंदा दोन तारीख उलटूनही सेवा निवृत्ती वेतन जमा न झाल्याने जिल्हा कोषागार कार्यालयात त्यांचे दूरध्वनी खणखणू लागले आहेत. मात्र, मार्च एंडच्या धावपळीमुळे हा निधी जमा होण्यास विलंब झाला. सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची पेन्शन रक्कम सध्या रखडली आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या संस्थांमध्ये तसेच निम्न सरकारी कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवानिवृत्ती वेतनाला तांत्रिक अडचणींमुणीं मुळे विलंब झाला आहे. मार्च एंड आणि ई-कुबेर यंत्रणा अद्ययावतीकरण यामुळे वेळेत निधी न मिळाल्याने ही रक्कम पेन्शनधारकांच्या खात्यावर जमा होऊ शकली नाही.(7 lakh pension stalled due to March end, deposits to be paid by 5th Possibilities )

राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात यंदा दोन तारीख उलटूनही सेवानिवृत्ती वेतन जमा न झाल्याने जिल्हा कोषागार कार्यालयात त्यांचे दूरध्वनी खणखणू लागले आहेत. मात्र, मार्च एंडच्या धावपळीमुळे हा निधी जमा होण्यास विलंब झाल्याने शुक्रवारपर्यंत (दि. ५) पेन्शन खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक कोषागार कार्यालयात त्याबाबत चौकशी करण्यात येत असून, पेन्शन जमा होण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांत सरासरी ६ तारखेचा अवधी लागू शकेल, असे सांगितले जात आहे. राज्यातील २७ कोषागार कार्यालयांमध्ये सुमारे ६ लाख ७५ हजार निवृत्त कर्मचारी आहेत सेवानिवृत्त कामगारांचे जीवन निवृत्ती वेतनावर अवलंबून असते. त्यावरच त्यांची उपजीविका असल्याने हे वेतन जमा न झाल्याने अनेक ज्येष्ठांनी कोषागार कार्यालयात धाव घेतली होती. यातील तांत्रिक अडचण दूर झाली असून, मंगळवारी हा निधी कोषागार कार्यालयांना वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पेन्शन खात्यावर वितरित होईल, अशी माहिती अप्पर कोषागार अधिकारी रमेश शिसव यांनी दिली.

काय घ्यावी खबरदारी?
जिल्हा कोषागार कार्यालयातून सर्व निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांची मासिक पेन्शन यापुढे शासनाच्या ई-कुबेर प्रणाली मार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेतून थेट पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती रमेश शिसव यांनी दिली. ज्या पेन्शनधारकांनी परस्पर बँक खात्यात बदल करून घेतले असतील, त्यांनी त्यांचे मूळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल, तेच खाते सुरू ठेवावे, भविष्यात पेन्शनबाबत अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले ज्या पेन्शनधारकांनी परस्पर बँक खात्यात बदल करून घेतले असतील, त्यांनी त्यांचे मूळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल, तेच खाते सुरू ठेवावे, भविष्यात पेन्शनबाबत अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले

टीम लय भारी

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

6 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

6 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

6 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

7 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

9 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

9 hours ago