व्यापार-पैसा

२ हजारांच्या नोटा बदलण्याची शेवटची संधी; उरलेत केवळ काही तास

तुमच्याकडे २ हजार रुपयांची नोट किंवा नोटा आहेत का? असतील तर २ हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तुमच्या हातात केवळ काही तास शिल्लक आहेत. ३० सप्टेंबरनंतर २ हजार रुपयांची नोट व्यवहारात चालणार नाही, हे रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे उद्या (३० सप्टेंबर) तुमच्याकडील २ हजारांच्या नोटा बदलण्याची शेवटची संधी आहे.

रिझर्व्ह बँकेने २ हजारांची नोट व्यवहारातून बाद करण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत दिली आहे. तोपर्यंत ज्यांच्याकडे या नोटा असतील त्यांनी बँकांमधून बदलून घ्यायच्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार ३१ ऑगस्टपर्यंत ३.३२ लाख कोटींच्या  २ हजारांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा झाल्या आहेत. तर अजून ०.२४ लाख कोटी रुपयांच्या नोटा ग्राहकांकडे आहेत. म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत ९३ टक्के नोटा सरकारकडे परत आल्या आहेत. आता ही आकडेवारी रिझर्व्ह बँकेने १ सप्टेंबरला सांगितली होती. त्यामुळे २९ दिवसांत आणखी बऱ्याच नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या असतील.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, भविष्यात या २ हजार रुपयांचे काय होणार? तर सरकारने याबाबत अजून स्पष्ट उत्तर दिलेले नाही. २ हजार रुपयांच्या नोटा १ ऑक्टोबरपासून व्यवहारात वापरल्या जाणार नसल्या तरी त्या चलनातून कायमस्वरुपी बाद करणार का, याबाबत लवकरच रिझर्व्ह बँक स्पष्टीकरण करेल, अशी अपेक्षा आहे.

रिझर्व्ह बँकेने यंदा १९ मे रोजी २ हजार रुपयांची नोट व्यवहारातून बाद करण्याची घोषणा केली आणि या सर्व परत करण्यासाठी ३० सप्टेंबरची मुदत दिली. १६ नोव्हेबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केली. एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा त्यांनी चलनातून बाद करत असल्याची घोषणा करून देशाला मोठा आर्थिक धक्का दिला होता. काळापैसा रोखण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले होते. त्यानंतर चलनातून एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोट बाद झाल्यामुळे भारतीयांचा प्रचंड आर्थिक कोंडी झाली होती. सर्वत्र लोक एटीएम, बँकेत रांगा लावत असल्याचे चित्र दिसत होते. लोकांकडे पैसे नव्हते. त्यावेळी चलनातील नोटांची तफावत दूर करण्यासाठी २ हजार रुपयांची नोट व्यवहारात आणण्यात आली. आणि अवघ्या सात वर्षांत २ हजारांची नोटदेखील चलनातून बाहेर काढली जात आहे.

 

टीम लय भारी

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

5 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

6 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…

6 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

7 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…

8 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

9 hours ago