व्यापार-पैसा

भारतीय पोस्ट ऑफिसची लखपती करणारी ‘ग्रामसुरक्षा योजना’

केंद्र सरकारने जनतेच्या आर्थिक सुबत्तेसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना आणल्या आहेत. यात गुंतवणूक करत आपण समाधानकारक बँक बॅलन्स उभारू शकतो. अर्थात या योजनेत खूप गुंतवणूक करण्याची गरज नाही. आपण दररोज काही रुपये वाचवत चांगला फंड उभा करू शकता. भारतीय टपाल खात्याची अशीच एक योजना असून ती सहजपणे लखपती करू शकते.

ग्रामसुरक्षा योजना ही या पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये उत्कृष्ट रिटर्न देणारी योजना आहे. विशेषतः ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी पोस्ट ऑफिसची एक महत्त्वाचे आर्थिक स्रोत आहे. भविष्य सुरक्षित करण्याचं मदत ही ग्रामसुरक्षा योजना करते. भारतीय टपाल विभागाने अनेक जोखीममुक्त बचत योजना सुरू केले आहेत. ग्रामसुरक्षा योजनेवर गुंतवणूकदारांना कर्जाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ हा चार वर्षांनंतर मिळतो. पॉलिसी खरेदी केल्यानंतर तीन वर्षांनंतरही जमा करता येते. आपण पॉलिसी पाच वर्षांच्या आत बंद करत असाल, तर बोनसपासून वंचित राहाल.

पोस्ट ऑफिसच्या ग्रामसुरक्षा योजनेत कोणताही भारतीय नागरिक गुंतणूक करू शकतो. गुंतवणूक करणाऱ्यांचे वय 19 ते 55 दरम्यान असणे गरजेचे आहे. या योजनेत मॅच्योरिटीची रक्कम ही कमाल 80 वर्षांपर्यंत मिळू शकते. यात वार्षिक दहा हजारांपासून दहा लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. आपण तिमाही, सहामाही, वार्षिक आधारावर पैसे जमा करू शकता. या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे पाच वर्षांच्या कव्हरेजनंतर तिचे विमा पॉलिसीत रूपांतर होते.

आपल्याला भरभक्कम फंड उभा करायचा असेल आणि श्रीमंत व्हायचे असेल, तर दमदार परतावा देणाऱ्या योजनेत पैसे गुंतवावे लागतील, नोकरी आणि व्यवसाय करण्याबरोबरच बचतही करणे तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच बचत केलेले पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवणेदेखील आवश्यक आहे. यानुसार लवकर गंगाजळी उभा करू शकतो. सरकारनेदेखील अनेक बचत योजना आणल्या असून, त्या चांगल्या परताव्यासह अनेक सुविधा प्रदान करतात. टपाल खात्याच्या ग्रामीण सुरक्षा योजनेचा विचार केला, तर त्यात खूप गुंतवणूक करण्याची गरज नाही. दररोज काही पैसे बाजूला काढून ठेवले तर चांगला बँक बॅलेन्स उभा राहू शकतो.

हे सुद्धा वाचा:

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनांनी तुमचे पैसे होतील दुपट्ट, वाचा सविस्तर

पोस्ट ऑफिसच्या योजनेत महिन्याला 500 रुपये गुंतवा, मिळवा 7.1 टक्के व्याज

पोस्ट खात्यात एकाच दिवसात 5000 ग्रामीण डाक सेवकांच्या बदल्यांना मंजूरी; बदल्यांसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू

इंडिया पोस्ट हे ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला पैसे जमा करण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. टपाल खाते हे ग्रामीण भागातील जनतेचा पैसा वाचवणे आणि त्यांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करण्याची भूमिका बजावते. देशातील लोकांची गरज ओळखून टपाल खात्याने अनेक प्रकारच्या जोखीममुक्त बचत योजना सुरू केल्या. या योजना चांगल्या परतावा देतात. पैकीच ‘ग्राम सुरक्षा योजने’ चा उल्लेख करावा लागेल, पोस्ट ऑफिसने ‘रूरल पोस्टल लाइफ इन्श्युरन्स पॉलिसी’ ला 1995 मध्ये लाँच केले. ‘ग्रामसुरक्षा योजना केवळ 50 रुपयांच्या मासिक हप्त्यावर 35 लाख रुपयांपर्यंत परतावा देणारी विमा पॉलिसी उपलब्ध करून देते.

Post Office, Gram Suruksha Yojana

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago