लंडनमधील प्रतिष्ठित केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या, त्यानंतर टीम इंडियाचा डाव 296 धावांवर संपला. दरम्यान, अजिंक्य रहाणेनी टीम इंडियाला सावरलं आहे. त्याची खेळी ही मोलाची ठरली. यानंतर त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तो मराठी बोलताना दिसत आहे.अजिंक्य रहाणे शार्दुल ठाकुरला मराठीमधून सूचना देत होता. रहाणे म्हणाला की,खेळत रहा खेळत रहा शाब्बास,एक एक बॉलचा विचार कर फक्त, चांगलं आहे खेळत रहा. त्यावर शार्दुल रहाणेला म्हणतो की, पॉइंट मागे केला हा .शार्दुलसोबतचा हा व्हिडिओ लोकांना आवडत आहे.
6 बाद 152 अशी दयनीय अवस्था टीम इंडियाची झाली होती. रहाणे आणि शार्दुल या दोघांनी 145 चेंडूत 109 धावांची भागीदारी केली.अजिंक्य रहाणे हा सुरवातीला शांततेत खेळत होता.जडेजा सोबत 71 धावांची तर शार्दुलसोबत 109 धावांची भर केली.या जोडीच्या सावध खेळीमुळे फॉलोअऑनचा धोका टळला आणि भारतीय चाहत्यांनी मोकळा श्वास घेतला.
हे सुध्दा वाचा :
विठूरायाची वारी झाली डिजिटल; वारी चुकेल्या वारकऱ्यांना आता घरीच मिळणार दर्शन
सीईटीचा निकाल ‘या’ दोन संकेतस्थळांवर पाहायला मिळणार !
अंतिम परिणामात याचा फारसा अर्थ नसेल, कोणास ठाऊक. पण त्या दोन तास आणि काही मिनिटांच्या भागीदारीत ऑस्ट्रेलियाची कसोटी लागली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप कोण जिंकलं यांवर लक्ष लागेल.
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…