क्रिकेट

जबरा फॅन! ऋतुराजला भेटण्यासाठी चाहत्याची थेट मेदानात एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल

चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी खूप वेडे असतात. याची उत्तम उदाहरणे सामन्यादरम्यान आपण अनेकदा पाहिली आहे. धोनी, विराट कोहली यांसारख्या खेळांडूचे चाहते मैदानात आल्याचे व्हिडिओ आपण पाहिले आहेत. आताही तसं काहीसं घडलं आहे. ऋतुराज गायकवाडला भेटण्यासाठी मैदानात चाहता उतरला आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 च्या उद्घाटनाच्या सामन्यात पुणेरी बाप्पाचा सामना कोल्हापूर टस्कर्सशी झाला. पुणेरी बाप्पाने हा सामना 8 गडी राखून जिंकला. पुणेरी बाप्पा संघाकडून कर्णधार आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाडने मॅचविनिंग इनिंग खेळली. या सामन्यानंतर त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

या सामन्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चाहता ऋतुराज गायकवाडला भेटण्यासाठी गेला आणि शेवटी गायकवाडला भेटल्यानंतर त्याच्या पायाला स्पर्श केला. ऋतुराज गायकवाड आणि पवन शाह यांनी डावाची सुरुवात केली. ऋतुराजने जबरदस्त फटकेबाजी करुन त्याने फक्त 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आहे. ऋतुराज गायकवाडने आपल्या खेळीत 27 चेंडूमध्ये 5 चौकार आणि 5 षटकार मारत 64 धावा केल्या. पवन शाहने 48 चेंडूत 57 धावा केल्या. दोघांनीही 110 धावांची भागीदारी केली.

हे सुध्दा वाचा:

समान नागरी कायद्यावर काय म्हणाले शरद पवार ?

‘आदिपुरुष’चा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल, चाहत्यांकडून ढोल-ताशांच्या गजरात चित्रपटाचे स्वागत

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पालिकेने दिला पाणी कपातीचा इशारा

ऋतुराज फलंदाजी करत असताना चाहत्याने मैदानात येऊन सामन्यात अडचण निर्माण केली. ऋतुराजच्या पायाला स्पर्श करुन तो तिथून निघून गेला. मोठ्या स्पर्धांमध्ये अशा घटना घडल्यावर कठोर कारवाई करतात. या एमपीएल स्पर्धेत घडलेल्या घटनांवर कोणतीही प्रकारे कारवाई करण्यात आली नाही.

रसिका येरम

Recent Posts

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

30 mins ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

1 hour ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

2 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

2 hours ago

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

4 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

4 hours ago