क्रिकेट

चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने उरकला साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे त्याची जीवनसाथी

चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2023 जिंकल्यानंतर ऋतुराज गायकवाडचा काही दिवसातच साखरपुडा झाला. तसाच चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे हा देखील विवाह बंधनात अडकणार आहे. तुषार देशपांडेने लहानपणीच्या मैत्रिणीसोबत साखरपुडा झाला आहे. तुषारची लहानपणीची मैत्रिण नभा गड्डमवार ही आहे. तुषारला शाळेच्या दिवसांपासूनच नभा आवडायची. साखरपुड्यानंतर स्वत: फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारा लाल चामड्याचा चेंडूही तुषारच्या साखरपुड्यामध्ये ठेवण्यात आला होता. या दोन्ही अंगठ्या चेंडूवर ठेऊन तुषार आणि नभाने फोटो काढला आहे. यानंतर एकमेकांना अंगठी घातली.

नभा गड्डमवार ही व्यवसायाने चित्रकार असून ती भेटवस्तूही डिझाइन करते. तिचे एक इंस्टाग्राम पेज आहे जिथे ती तिच्या पेंटिंग्ज आणि इतर कामांची छायाचित्रे शेअर केली आहे. तुषार देशपांडेच्या साखरपुड्याला चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू शिवम दुबे आणि त्याची पत्नी अंजुम खानही उपस्थित होती. she got promoted from my school crush to my fiance असे तुषारने त्याच्या पोस्टवर लिहिले आहे.

हे सुध्दा वाचा:

शिवसेनेच्या जाहिरातीमुळे फडणवीसांचा एकनाथ शिंदेंसोबतचा कोल्हापूर दौरा रद्द ?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

मुंबई- पुणे एक्सप्रेसवर मोठा अपघात, ऑइल टॅंकरला आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

जानू भोये नगरमधील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या झोपडीधारकांच्या घराचे स्वप्न साकार

ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आदी खेळांडूनी तुषार देशपांडेचे अभिनंदन केले आहे. आमच्या क्लबमध्ये तुझे स्वागत भाऊ, असे ऋतुराजने लिहिले आहे. दरम्यान, तुषार देशपांडेने आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या.

रसिका येरम

Recent Posts

Eknath Shinde | Ajit Pawar | आताच्या राजकारणात लबाडी, पूर्वीचे राजकारण निष्ठेचे अने प्रामाणिकपणाचे

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…

23 mins ago

Eknath Shinde सातारचे, पण स्वत:चीच घरे भरतात | उदयनराजे १५ वर्षात आमच्या गावात आले नाहीत

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…

38 mins ago

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

14 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

15 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

17 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

17 hours ago