क्राईम

अंबडला फळ विक्रेत्याचे कॅरेट व हातगाड्याची जाळपोळ

फळविक्रेत्या व्यावसायिकाच्या फळांच्या कॅरेटसह लोखंडी हातगाडा, वजनकाटा डिझेल टाकून पेटवून देत आर्थिक नुकसान केल्याची घटना कामटवाडा येथे घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी कृष्ण माणिकराव डक (रा. मुस्कान सोसायटी, वडाळा-पाथर्डीरोड, नाशिक) यांचा फळविक्रीचा व्यवसाय असून, ते अॅपेरिक्षाद्वारे होलसेल मार्केटमधून फळ घेऊन येतात व दिवसभर फळ विक्री करून रात्री अॅपेरिक्षा घराजवळ उभी करतात. डक हे अंबड एमआयडीसीमध्ये सुलभा चौधरी यांच्या मालकीच्या प्लॉटवर कोणी अतिक्रमण करु नये म्हणून तेथे राहतात. या प्लॉटला तारेचे कंपाऊंड केलेले असून, एका बाजूला लोखंडी गेट बसवलेले आहे. या ठिकाणी फिर्यादी डक हे अॅपे रिक्षा व फळांचे कॅरेट ठेवत असतात.

दि. १५ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मार्केटमध्ये फळे खरेदी करण्यासाठी जायचे असल्याने डक हे प्लॉटवर असलेली अॅपेगाडी घेण्यासाठी आले होते. मात्र त्यावेळी
गेट उघडे होते व कुलूप खाली पडलेले होते. डक यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी फळांनी भरलेले कॅरेट पुर्णपणे जळालेले होते. तर काही कॅरेट अर्धवट जळालेले होते. तसेच २ हातगाड्यांचा लाकडी साठा तुटलेला होता. तर इतर दोन हातगाड्या तसेच त्यांच्यावरील छत्री व जुना वजनकाटा हे साहित्य अस्तव्यस्त पडलेले होते. ही माहिती फिर्यादी डक यांनी त्यांच्या मोठ्या भावास कळवली. त्यानंतर ते काही वेळात प्लॉटवर आले.

दरम्यान दि. १५ मार्च रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास फिर्यादी डक व सागर साखरे हे दोघे जण पवननगर येथे उभे होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा इसम विनोद बोराडे (रा. कामटवाडा, अंबड) हा मोटारसायकलवर तेथे आला. त्याने मित्राच्या गाडीचे पेट्रोल संपले असून, माझ्यासोबत चला, मी राणेनगर येथील पेट्रोल पंपावर बाटलीमध्ये डिझेल घेतले. त्यानंतर मोटारसायकलवर बसून बोराडेयाने फिर्यादी डक यांना इंडोलाईन फर्निचरजवळ सोडले. त्यानंतर गाडीमध्ये डिझेल टाकून येतो असे सांगून बोराडे मोटरसायकलवर निघून गेला. परंतुबराचवेळ वाट पाहूनही बोराडे परत न आल्याने फिर्यादी व त्यांचा मित्र जनता स्वीटकडे जात होते. तेव्हा एका जणाने असे सांगितले की, विनोद बोराडे हा डक यांच्या प्लॉटमध्ये असलेले कॅरेटजवळ डिझेल टाकत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने ह्या कॅरेटला व हातगाड्यांना आग लावून मोटारसायकलवरुन पळून गेला. त्यावेळी फिर्यादी डक यांच्याकडे फोन नसल्याने तो कोणाशीही संपर्क साधू शकले नाही. त्यानंतर त्यांनी ही माहिती एमआयडीसी पोलीस चौकी येथे दिली. तसेच ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाने मदत केली. त्यावेळी फियादी डक यांच्या लहान बहिणीचे लग्न असल्याने त्यांना कुटुंबियांसह मुळ गावी परभणी येथे गेले होते. त्यावेळी लग्न आटोपून आल्यानंतर कृष्णा डक यांनी काल अंबड पोलीस ठाण्यात विनोद बोराडे याच्याविरुद्ध जाळपोळीची फिर्याद दिली असून, या घटनेत १० हजार रुपये किंमतीचे १०० प्लास्टिकचे कॅरेट व १ हजार रुपये किंमतीचा हातगाडीचा लाकडी साठा जाळून आर्थिक नुकसान केले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

2 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

6 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

8 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

9 hours ago