क्राईम

ATM Fraud : मुंबईत 22 ग्राहकांच्या खात्यातून 2.24 लाख काढले ? ना पिन शेअर केला ना OTP,

टीम लय भारी

मुंबई : बँकेशी संबंधित कुठलेही तपशील शेअर न करताच आर्थिक गंडा बसल्याची तक्रार मुंबईतील काही ग्राहकांनी केली आहे. तीन तासांच्या अवधीत तब्बल 22 जणांना एकूण 2.24 लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती आहे(ATM Fraud: 2.24 lakh withdrawn from accounts of 22 customers in Mumbai)

या ग्राहकांच्या खात्यातून एटीएमद्वारे पैसे काढण्यात आल्याचं समोर आलं आहे. एटीएममधून व्यवहार केल्यानंतर स्कॅमरद्वारे त्यांच्या माहितीची चोरी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईत डॉक्टरांचं काम बंद आंदोलन, OPD सेवेला फटका; आदित्य ठाकरेंनी चर्चेसाठी बोलवलं

प्रदर्शनापूर्वीच RRR चित्रपटाचा नवा विक्रम! अमेरिकेतील बहुसंख्य मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट!

काय आहे प्रकरण?

27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेत हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती आहे. 11 ते 22 नोव्हेंबर या काळात बेस्ट ट्रेनिंग स्कूलमध्ये वरिष्ठ प्रशासकीय पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने पोलिसात दिलेल्या तक्रारीत आपले 2.7 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हटलं आहे.

कार्ड स्किमरद्वारे क्लोनिंगचा संशय

संध्याकाळी 7:30 ते रात्री 10:30 या वेळेत हे ट्रँझॅक्शन झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कार्ड स्किमरचा वापर करुन एटीएम कार्डचे डिटेल्स कॅप्चर केले आणि क्लोनिंग करुन एटीएम मशिनमधून पैसे काढले, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

अजित पवारांनी बूस्टर डोससंबधी मांडली भूमिका; म्हणाले “दोन्ही डोस घेऊनही बाधा झाली आहे, तर…

SWAT head constable dismissed from service in Noida

खात्यातून 29 व्यवहार

आपल्या खात्यातून 29 व्यवहार झाल्याचा उल्लेख फिर्यादीने तक्रारीत केला आहे. बँक अधिकाऱ्यांनी हे प्रकरण निस्तरण्यात कुठलीही घाई दाखवली नाही, मला माझे पैसे परत मिळणार का, हेही माहित नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे.

मात्र ग्राहक किंवा पोलिसांकडून कुठलीही तक्रार आलेली नाही, असा दावा एका वरिष्ठ बँक अधिकाऱ्याने केल्याचं वृत्त ‘टाईम्स नाऊ’ने दिलं आहे. बँकेकडे असे प्रकार रोखण्यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

टीम लय भारी

Recent Posts

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

26 mins ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

4 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

4 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

6 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

7 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

7 hours ago