क्राईम

पैठण: अख्खं गाव लुटण्याचा बेत, 40 घरांच्या कड्या लावल्या, शेतकऱ्याला सात लाखांना लुटलं!

टीम लय भारी

औरंगाबादः पैठण तालुक्यातील (Paithan) वडजी गाव हे मोसंबी, डाळींब, भाजीपाला उत्पादक आणि बागायतदारांचे सधन गाव. याच वडजीवर मोठा दरोडा (Robbery)  घालण्याच्या इराद्याने शुक्रवारी दरोडेखोर गावात घुसले. त्यांनी जवळपास 40 घरांच्या दराच्या कड्या बाहेरून लावल्या. एका शेतकऱ्याच्या घरी मोठी लूट केली(Aurangabad: A farmer was robbed of Rs 7 lakh)

पण गावकऱ्यांच्या सावधगिरीमुळे दरोडेखोरांचा हा प्रयत्न फसला. एवढ्या मोठ्या संख्येने घरांना कड्या लावून जबरी चोरी करण्याचा तालुक्यातील हा पहिलाच प्रकार आहे. त्यामुळे वडजी गावासह पैठण तालुक्यात या घटनेची जबर दहशत पसरली आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा, भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप

Audi starts local manufacturing of Q7 SUV at Aurangabad plant The company is expecting high double-digit growth in this year and 2022 banking

शेतकऱ्याला सात लाखांना लूटले

गेल्या काही दिवसांपासून पैठण तालुक्यात चोरी आणि दरोड्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यातच आता वडजी येथील भयंकर प्रकाराने अख्खा तालुका हादरला आहे. वडजी शिवारातील सखाराम दामोदर वाघमारे हे आई, दोन मुले, सून, नातू यांच्यासह राहतात. शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ते झोपी गेले असता पहाटे त्यांना जाग आली.

घरात डबे वाजण्याचा आवाज आल्याने ते घरात गेले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच मागील दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी घराबाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता समोरील बाजूने कडी लावल्याचे कळले. त्यामुळे त्यांनी चुलतभाऊ संतोष वाघमारे यांना फोन करून बोलावले व कडी उघडली. यावेळी त्यांना घरातील सर्वच सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा जवळपास 7 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याच कळले.

दरोड्याची गंभीर दखल, तपास सुरू

सदर घटनेची माहिती पाचोड पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. घटनेची माहिती दरोडा प्रतिबंधक पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिली.

पोलीस सूत्रानुसार, एखाद्या गावात मोठ्या संख्येने घरांना कड्या लावून जबरी चोरी करण्याचा हा तालुक्यातील पहिलाच प्रकार आहे. मात्र गावातील लोक सावध झाल्याने त्यांचा प्रयत्न फसला. वडजीत चोरट्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी जवळपास 30-40 घरांना बाहेरून कड्या लावल्या. त्यावरून हे चोरटे किती चौकस होते, हे लक्षात येते.

टीम लय भारी

Recent Posts

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

3 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

3 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

6 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

6 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

6 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

7 hours ago