क्राईम

नाशकात बांधकाम व्यवसायीला साडेतीन कोटी रुपयांना गंडा

कटकारस्थान रचून कंपनीमध्ये राईस पुलरच्या नावाखाली रेडिओ ॲक्टिव्हबाबत माहिती देऊन गुंतवणूक करण्यास भाग पाडून एका व्यावसायिकाची ( Builder duped ) पश्चिम बंगालच्या भामट्यांनी साडेतीन कोटी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी राहुल शांताराम सावळे (वय 45, रा. गितां जली कॉलनी, इंदिरानगर, नाशिक) हे व्यावसायिक आहेत. ते लॅण्ड डेव्हलपरचा व्यवसाय करतात. मात्र कोरोना काळात व्यवसाय मंदावल्याने त्यांनी नवीन काही तरी व्यवसाय करायचा म्हणून त्या व्यवसायाच्या शोधात ते होते. त्यादरम्यान 13 जुलै 2022 रोजी रघुवीर ओंकार संधू यांनी त्यांना फोन करुन सांगितले की, मी इनव्होल्टा कंपनीचा संचालक बोलतोय, तुम्हाला बिझनेसमध्ये जो काही तोटा झाला आहे त्यासाठी तुम्ही आमच्या कंपनीमध्ये साधारणत: 30 लाख रुपये गुंतवणूक करा, आमची कंपनी रेडी ॲक्टिव्ह मटेरियलमध्ये काम करते.( Builder duped of Rs 3.5 crore in Nashik )

तसेच आम्ही युरेनियम हा पदार्थ शोधून काढतो.त्याचा वापर ॲटोनॉमिक एनर्जी तसेच डिफेन्स संस्थांमध्ये होतो. त्याची किंमत बाजारपेठेत कोटी च्या पुढे येते. ते खूप दुर्मिळ असते. आमच्याकडे आमच्या स्वत:चे रिसर्च सेंटर आहे. त्यासाठी खूप खर्च येत असतो. म्हणून आम्ही लोकांकडून इन्व्हेस्टमेंट स्वरुपात रक्कम स्वीकारुन त्यावर गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला मोठ्याप्रमाणात मोबदला देतो.त्यामुळे तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला 100 को टी रुपयांचा नफा मिळवून देऊ, असे पटवून दिले. मात्र जोपर्यंत हा व्यवहार होत नाही, तोपर्यंत याची कुठेही वाच्चता करु नका, अन्यथा भारत सरकार अथवा जागतिक बँकेकडून यावर कारवाई होऊ शकते, असे त्याने सांगितले. त्यावर फिर्यादी सावळे यांनी माझ्याकडे सध्या ऐवढी रक्कम नाही, तुम्ही मला तुमच्या कंपनीचे सर्व डिटेल द्या, त्यानंतर मी विचार करुन सांगतो. पुन्हा 27 जुलै 2022 रोजी कांतीकुमार (रा. वकदा, कोलकाता) याचा फोन आला. इनव्होल्टा कंपनीकडून तुमचा नंबर मिळाला. ही कंपनी जे काही काम करते, त्यासंदर्भातील सर्व वस्तु माझ्याकडे आहे.परंतु माझ्याकडे इन्व्हेस्ट करण्यासाठी पैसे नाही, तुम्ही जर पैसे उपलब्ध करुन दिले तर आपल्या दोघांचा चांगला फायदा होईल, असे म्हणून सावळे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एक -दोन महिन्यांनी रघुवीर ओंका ओं र संधू याने फोन करुन फिर्यादी सावळे यांना कोलकाता येथे येण्याचा आग्रह केला. त्यानंतर 6 सप्टेंबर 2022 रोजी पुन्हा एकदा फोन करुन फिर्यादी यांच्या मोबाईलवर कंपनीचा ॲड्रेस व लोकेशन पाठवले. त्यानंतर सावळे हे कोलकाता येथे गेले असता एअरपोर्टवर कंपनीचा माणूस त्यांना घेण्यासाठी आला.

त्यानंतर रघुवीर संधू याने फिर्यादी सावळे यांची कंपनीत असलेल्या चंदन बेरा, मुकेशकुमार आणि जयदीप पांडे यांच्याशी ओळख करुन दिली. यावेळी सर्व जण चंदन बेरा याच्या ऑफिसमध्ये बसलेले होते. त्या सर्वांनी फिर्यादी सावळे यांना डी.आर.डी.ओ.चे सर्टीफिकेट दाखवले. ॲटोनोमिक रेग्युलेटरी बोर्ड ऑफ इंडियाचे लायसन्स तसेच कंपनीशी संबंधित काही कागदपत्रे दाखवली. त्यानंतर या सर्व आरोपींनी पीं मिळून तुम्ही लवकरात लवकर पैसे गुंतवणूक करा, त्यामुळे तुम्हाला पुढचा सेलरचा पार्ट सांभाळायचा आहे, अशा प्रकारे त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून सावळे यांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यानुसार सावळे यांनी वेळोवेळी आरोपींनी पीं सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे 3 कोटी 46 लाख वेगवेगळ्या बँक खात्यात तसेच रोख स्वरुपात दिले. दरम्यान 13 जुलै 2022 ते 5 एप्रिल 2024 या दोन वर्षांच्या कालावधीत चंदनकुमार बेरा (रा. न्यू टाऊननॉर्थ, पश्चिम बंगाल), तसेच यामध्ये सहभागी असलेले रघुवीरकुमार संधू (रा. विमाननगर, पुणे), मुकेश कुमार (रा. गोपालपुर, कोलकाता, पश्चिम बंगाल), कांतीकुमार (रा. वकदा मायापूर, कोलकाता), आशिष रॉय (रा. लेदर कंपाऊंडजवळ, कोलकाता) यांच्यासह त्यांचे साथीदार अरुण घोष, बोलोमन मिन्ट या सर्वांनी संगनमत करुन कटकारस्थान रचून फिर्यादी राहुल सावळे यांचा विश्वास संपादन करुन त्यांना कंपनीमध्ये राईस पुलरच्या नावाखाली रेडिॲक्टिव्हबाबत माहिती देऊन गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार सावळे यांनी 3 कोटी 46 लाख रुपयांची गुंतवणूक केली. मात्र या सर्व आरोपींनी पीं या रकमेचा अपहार करुन त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहे.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

23 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago