क्राईम

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत मार्केटमध्ये घडला आहे. तसेच पंधरा दिवसांत पैसे न दिल्यास मुलास मारुन (Builder’s son threatened with death) टाकण्याचीही धमकी सराईताने दिली. याप्रकरणी बिल्डरच्या फिर्यादीवरुन दोन संशयितांविरुद्ध सरकारवाडा पोलिसांनी  गुन्हा नोंदवला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केटमध्ये कार्यालय असलेले बांधकाम व्यावसायिक समीर श्यामराव केदार (वय ४८) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित सूर्यभान गयाजी जाधव आणि ओम सूर्यभान जाधव (रा. गंगापूरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा  नोंद आहे.(Builder’s son threatened with death; The accused demanded a ransom of ‘so many’ lakhs)

दरम्यान, २३ एप्रिल रोजी दुपारी दोन्ही संशयित केदार यांच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी बेकायदेशिररित्या वीस लाख रुपयांची मागणी केली. यासह रक्कम पंधरा दिवसांत न दिल्यास केदार यांना जीवे मारण्याची धमकी  फिर्यादीच्या वडिलांना दिली. याप्रकरणी केदार यांनी सरकारवाडा पोलिसांत धाव घेतली आहे. तर दोन्ही संशयित पसार असून त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
संशयित जाधव हा एक जमीन खरेदी करणार होता. मात्र, त्याचा व्यवहार पूर्ण न झाल्याने केदार यांनी संबंधित जमीन खरेदी केली. त्यामुळे केदार यांच्याकडे जाधव यांनी दुसऱ्या एका जमिनीचा प्रस्ताव ठेवला. जाधव यांची जमीन खरेदी करण्यासाठी केदार यांनी पूर्वी संमती दर्शवली. त्यासाठी धनादेशही देण्यात आले. मात्र, जाधवच्या कारनाम्यांची माहिती मिळाल्यावर केदार यांनी धनादेश ‘स्टॉप’ केले. त्यामुळे जाधव यांना पैसे मिळालेच नाहीत. दरम्यान, इतर गुन्ह्यांत संशयित जाधव हा पाच वर्षांपासून कारागृहात होता. दोनवेळेस जामीनावर तो बाहेर आला. आता कारागृहातून बाहेर आल्यावर केदार यांचे कार्यालय गाठून त्याने पैश्यांची मागणी करीत धमकी दिली.

टीम लय भारी

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

6 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

7 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

7 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

1 week ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

1 week ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

1 week ago