क्राईम

हृदयविकाराच्या धक्क्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू

नाशिकमध्ये धक्कादायक बातमी समोर आली आहे. 16 वर्षीय मुलाचा हृदय विकाराच्या(heart attack) धक्क्याने मृत्यू झाला आहे. तेजस विठ्ठल आहेर असं मृत तरुणाचं नाव आहे. शाळकरी मुलाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.दहावीची परीक्षा दिल्यानंतर सुट्टीचा आनंद घेत असलेला लहवित येतील विद्यार्थी तेजस आहेर व सोळा राहणार नाही तालुका जिल्हा नाशिक हा घरीच कुटुंबीयांसोबत बसलेला असताना अचानक भोवळ येऊन खुर्चीवरून खाली पडला. त्यास नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याची प्राणज्योत मालवल्याचे सांगतात कुटुंबीयांना धक्का बसला. आयटी इंजिनियर होण्याचे तेजस चे स्वप्न होते. लहवित शेतकरी विठ्ठल महादू आहेर यांचा तेजस हा मुलगा असून त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.(Class X student dies of heart attack )

तेजस दहावीच्या वर्गात शिकत होता त्याच्यावर लहवित येथील स्मशानभूमी येथे अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्या पक्षात आई, वडील, आजोबा, बहिण, सुळते असा मोठा परिवार वर आहे. वारकरी संप्रदायाचे जेष्ठ महादू गोपाळा आहेर यांचा तो नातू तर प्रख्यात विविध रामदास आहेत यांचा तो पुतण्या होता. नाशिकच्या लहवित गावात ही घटना घडल्यानंतर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उन्हाळा सुरू झाला, की साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्याचा काळ म्हणजे उष्माघाताची शक्यता वर्तवली जाते. उष्माघात म्हणजे केवळ उष्णतेचा त्रास किंवा उन्हाचा त्रास नसून, यामुळे इतरही काही आजार संभवतात; पण उष्माघातामुळे हृदयविकाराचा झटकासुद्धा येऊ शकतो, हे फार कमी लोकांना माहिती आहे.

बाहेरचं तापमान प्रचंड वाढत असतं आणि तुलनेत शरीराच्या आत पाण्याचं प्रमाण वेगानं कमी होत असतं. यामुळं शरीरातल्या काही क्रियांवर परिणाम होतो. यातच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, असं तज्ज्ञ सांगतात. घराबाहेर कामाशिवाय पडणं टाळा. शिवाय आरोग्याची काळजी घ्या. तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका गेल्या काही महिन्यांपासून वाढत आहे. तणाव, हवामानातील बदल, खाण्या-पिण्याच्या पद्धती बदलती जीवनशैली यामुळे हा धोका वाढत असल्याचा अंदाज आहे.

टीम लय भारी

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

7 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

8 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

9 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

12 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

13 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

13 hours ago