क्राईम

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.सुभाषचंद्र कौशलप्रसाद मिश्रा (वय 56) मुख्याध्यापक श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय श्रमिक नगर, सातपूर, नाशिक व दिनेशकुमार जमुनाप्रसाद पांडे (वय 57) उप शिक्षक श्री शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय श्रमिक नगर ,नाशिक अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.(Deputy teacher, principal caught by ACB for accepting bribe of Rs 10,000)

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांची दोन मुले महानगरपालिका शाळा सातपूर नाशिक येथे मराठी माध्यमात इयत्ता 7 वी मध्ये शिकत आहेत.परंतु तक्रारदार हे मूळचे बिहार येथील राहणारे असुन हिंदी भाषिक आहेत. तेंव्हा त्यांच्या मुलांसाठी मराठी माध्यमात शिकण्यास अडचण येत असल्याने त्यांना शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालय, श्रमिकनगर, सातपूर, नाशिक या शासन अनुदानित शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी 29 एप्रिल रोजी मुख्याध्यापक मिश्रा व उप शिक्षक पांडे यांना भेटुन प्रवेश देण्याबाबत विनंती केली. त्यावेळी मुख्याध्यापक मिश्रा व उपशिक्षक पांडे यांनी तक्रारदाराच्या दोन मुलांसाठी प्रत्येकी 8 हजार अशी सोळा हजार रुपयांची इमारत निधीच्या नावाखाली लाचेची मागणी केली होती व त्याची कोणतीही पावती मिळणार नसल्याचे सांगितले होते.

आज तक्रारदार पुन्हा त्यांचे मुलांचे शाळा प्रवेशासाठी मुख्याध्यापक मिश्रा व उप शिक्षक पांडे यांना शाळेत भेटले असता त्यांनी 16000 रुपये लाचेची (bribe) इमारत निधीच्या नावाखाली मागणी करून त्याची कोणत्याही प्रकारची रिसीट /पावती देण्यास नकार देऊन 16000 रुपयांपैकी 10000 रुपये पहिला हप्ता म्हणुन उप शिक्षक दिनेशकुमार पांडे यांनी स्वीकारला. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक विश्वजीत जाधव, पो. ह .प्रणय इंगळे, पो .ह .सुनिल पवार, पो. ह .सचिन गोसावी, पो. ना .दिपक पवार यांनी केली .

टीम लय भारी

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

7 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

8 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

9 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

9 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

9 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

11 hours ago