क्राईम

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक ( Duped) केल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की वेगवेगळ्या सहा व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमांनी फिर्यादी यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधला. त्यामुळे फिर्यादी यांचा अज्ञात इसमांवर विश्वास बसला. त्यानंतर अज्ञात भामट्यांनी फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याचे आमिष दाखवले.( Duped of Rs 17.5 lakh on the pretext of making profit in stock trading)

त्याला भाळून फिर्यादी यांनी भामट्याने सांगितलेल्या सेठी ट्रेडिंग फर्ममध्ये गुंतवणूक करण्यास सांगून वेगवेगळ्या बँक खात्यांवर दि. १९ मार्च ते ५ एप्रिल २०२४ या कालावधीत वेळोवेळी १७ लाख ७५ हजार १०० रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार फिर्यादी यांनी ही रक्कम जमा केली; मात्र बरेच दिवस उलटूनही गुंतविलेली रक्कम व त्यावरील नफा मिळत नसल्याने फसवणूक ( Duped) झाल्याची बाब लक्षात आली.

याबाबत फिर्यादी यांनी वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून बोलणार्‍या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र होऊ शकला नाही. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

9 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

10 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

11 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

13 hours ago