क्राईम

नाशिकच्या वणी स्थानकात एसटी बसच्या इंजिनने घेतला पेट

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वणी स्थानकात बसच्या इंजिनने अचानक पेट (Engine of ST bus caught fire) घेतल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. बसमधील २७ प्रवाशांना त्वरीत उतरवून आग विझविण्यात आली. वणी स्थानकात सकाळी साडेआठच्या सुमारास नाशिकहुन कळवणकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची पिंपळगाव आगाराची जादा बस उभी होती. बसमध्ये प्रवासी बसले होते. अचानक बसच्या इंजिनमधून धूर निघू लागला. इंजिनने पेट घेतला.(Engine of ST bus caught fire in Nashik’s Vani station)

चालक बाबाजी गवळी यांनी प्रसंगावधान सर्व तऱ्हेची खबरदारी घेतली. वाहक ज्योती नाडे यांनी बसमध्ये असलेल्या प्रवाशांना खाली उतरविले. बसमधील अग्निरोधक सिलिंडर अकार्यक्षम असल्याने चालुच झाले नाही. गाडीचा गिअर सटकून गाडी मागे जाऊ लागली. त्यावेळी गाडी पूर्ण रिकामी होती. गाडीमागे कुठलीही दुसरी गाडी आणि प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. उपस्थित तुषार शर्मा, वर्तमानपत्र विक्रेते सुनील महाले, वाहतूक नियंत्रक के. के. चौरे, चालक गवळी यांसह उपस्थित प्रवासी आणि नागरिकांनी प्रसंगावधान राखत गाडीच्या चाकाखाली मोठे दगड टाकून गाडी थांबवली.

बसमध्ये चालकाने ठेवलेल्या कॅनमधील पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, आग विझली नाही. स्थानकात असलेल्या प्रवाशांनी धाव घेऊन वाळू, माती, पाणी टाकून आग विझवली. चालकाचे सीट आणि जवळचा भाग खाक झाला. या बसमध्ये २७ प्रवासी होते. प्रवाशांना तातडीने गाडीबाहेर उतरविण्यात आल्याने कोणी जखमी झाले नाही.

टीम लय भारी

Recent Posts

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

18 hours ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

19 hours ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

3 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

3 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

3 days ago

लक्ष्मण हाके, तुम्ही आंदोलन करा; पण छगन भुजबळांसारख्या भ्रष्ट नेत्याला श्रेय देवू नका

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे(Manoj Jarange) यांनी वर्षभरापासून रान पेटवलं होतं. पण जरांगे यांना ब्रेक लावण्याचं…

3 days ago