क्राईम

नाशिकच्या पाथर्डी गावात देहविक्री :पाच अटकेत

‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली चालविला जाणारा देहविक्रयचा अड्डा इंदिरानगर पोलिसांनी बनावट ग्राहक (डि-कॉय) पाठवून उद्धवस्त केला. पाथर्डी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हिलक्रिस्ट नावाच्या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील एका गाळ्यामध्ये हा अवैध व्यवसाय चालविला जात होता. पोलिसांच्या पथकाने याठिकाणाहून दोन पिडित महिलांची सुटका केली आहे. तसेच संशयित चौघा पुरूषांना ताब्यात घेतले आहे. पाथर्डी गावाच्या शिवारात एका व्यापारी संकुल असलेल्या इमारतीत स्पाच्या नावाखाली देहविक्रयचा अड्डा चालविला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांना मिळाली. मागील काही दिवसांपासून हा अड्डा चालविला जात होता. शरमाळे यांनी खात्री पटवून छापा टाकण्याची तयारी केली.

बनावट ग्राहक तयार करून त्याच्याकडे पाचशे रूपयाच्या चार चलनी नोटा दिल्या. बनावट ग्राहकाने स्पा सेंटरमध्ये प्रवेश करत काउंटरवर रक्कम जमा केली आणि यावेळी काउंटरजवळ बसलेल्या महिलेने त्याला दोन महिलांना दाखविले. एका पार्टेशन असलेल्या खोलीत एका महिलेसोबत पाठविले. या बनावट ग्राहकाने ‘मिस्ड कॉल’चा इशारा देताच पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे, सहाय्यक निरीक्षक निखिल बोंडे, उपनिरीक्षक सुहासिनी बारेला, अंमलदार जावेद खान, सागर परदेशी, मुश्रीफ शेख, चंद्रभान पाटील, धनवंता राऊत यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने गाळ्यामध्ये छापा टाकून तपासणी केली असता त्या ठिकाणी दोन पिडित महिलांकडून देहविक्रय करून घेतले जात असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी विजयकुमार नायर (४३,रा.दामोदरनगर), सुलेमान मुबारक हुसेन अन्सारी(३५), अजय बबलू चव्हाण (३०,रा.दामोदरनगर), रवि कोंडाजी मुठाळ(२७,रा.लहवित) यांच्यासह एका महिलेलाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरूद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निखिल बोंडे हे करित आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago