क्राईम

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा (duped) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राचार्यांवर गुन्हा दाखल केला आहे.त्यांना लवकरच अटक होण्याचीही शक्यता आहे. वसतिगृहासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करुन ते खरेदी न करता, केवळ बिले सादर करुन ती वटवून संशयिताने भ्रष्टाचार केल्याचे निष्पन्न झाले आहे.(Former Satpur ITI principal duped of lakhs by submitting fake bills)

याबाबत अधिक माहिती अशी की, सुभाष मारुती कदम हे तत्कालिन प्रभारी प्राचार्य 2017 ते 2018 या कालावधीत सातपूर आयटीआय येथे कार्यरत होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे काही दिवसांपूर्वी सातपूर आयटीआयमार्फत वसतिगृहांतील साहित्याच्या खरेदीत कदम यांनी अपहार (duped) केल्याचा तक्रार अर्ज प्राप्त झाला होता.

बनावट बिले सादर करुन 19 लाखांचा अपहार

या अर्जाची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे यांनी पोलीस उपअधिक्षक अनिल बडगुजर, वैशाली पाटील आणि नरेंद्र पवार यांना तपास करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पथकाने तक्रारीचा तपास केला असता सुभाष कदम आणि केंद्र शासनाच्या जेम (जेईएम) पोर्टलवर नोंदणी केलेल्या साहित्याचे गेट-वे सिस्टीमचे संचालक आणि पुरवठादार रोशन बधान आणि गोकुळ पूरकर यांच्यातील आर्थिक व्यवहार संशयास्पद आढळून आले. तसेच बनावट बिले तयार करुन ती मंजूर केल्याचे आढळून आले. त्यानुसार, पुरावे मिळाल्यावर उपअधीक्षक वैशाली पाटील यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तब्बल 19 लाखांचा हा घोटाळा असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीनुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयितांना कुठल्याही क्षणी अटक करण्याची शक्यता आहे.

टीम लय भारी

Recent Posts

आमचं सरकार आलं तर जरांगेंची मराठा आरक्षणची मागणी प्रथम पूर्ण करणार, जयंत पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का?…

4 days ago

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची स्ट्रॅटेजी तयार; देवेंद्र फडणवीस

राज्यात भाजपच्या आलेल्या कमी जागा ४८ पैकी ४५ हून अधिकचचा नारा देऊनही केवळ ९ जागांवर…

4 days ago

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही…

4 days ago

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू (doctor's life) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…

4 days ago

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात…

4 days ago

नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा दर परवडणारा नाही, त्यापेक्षा… शेतकरी काय म्हणाले?

उन्हाळ कांद्याचे ( onion) भाव कोसळल्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्राने 'नाफेड' व 'एनसीसीएफ'या दोन…

4 days ago