क्राईम

नाशकात आयकर विभागाची मोठी कारवाई; ३० तास धाड अन् सापडले २६ कोटींचे घबाड

गेल्या काही दिवसांपासून आयकर विभाग (Income Tax) कर बुडविणाऱ्यांविरोधात चांगलाच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच आयकर विभागाने नांदेडमध्ये छापेमारी करत कोट्यवधींचे घबाड जप्त केले होते. त्यानंतर आता नाशिकमध्ये देखील आयकर विभागाकडून अशीच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. नाशकातील एका सराफ व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली असून या छापेमारीत तब्बल २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या (Income Tax department) या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून सराफ व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.(Income Tax department’s big action in Nashik; 30 hours of raids and busts worth Rs 26 crore)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाची (Income Tax department) ही कारवाई सलग ३० तास चालली असून या कारवाईसाठी नाशिक, नागपूर आणि जळगावचे अधिकारी एकत्र आले होते. तसेच ज्यावेळी आयकर विभागाच्या पथकाने छापेमारी केली त्यावेळी या सराफ व्यावसायिकाच्या एका खोलीत पाचशे रुपयांच्या चलनी नोटांचा खच आढळून आला. ही रक्कम इतकी मोठी होती की, रक्कम मोजण्यासाठी या अधिकाऱ्यांना तब्बल १४ तास लागले. यानंतर जप्त केलेली रक्कम नेण्यासाठी आयकर विभागाला एकूण सात कार बोलवाव्या लागल्या. या कारवाईत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण २६ कोटींची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त केले.

दरम्यान, ५० ते ५५ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून आयकर विभागाच्या या पथकाने या सराफ व्यावसायिकाच्या शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेले कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासले आहेत. याशिवाय मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली. तसेच नाशिक शहरातील एका सराफ व्यावसायिकाकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता सापडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.

टीम लय भारी

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

5 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

6 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

8 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

8 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

9 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

9 hours ago