Categories: क्राईम

विमा प्रतिनिधीनेच घातला ठेवीदारांना करोडोंचा गंडा

विमा प्रतिनिधीनेच ठेवीदारांना करोडोंचा गंडा (duped) घातल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधील मनमाड येथे घडला आहे. युनियन बँकेत हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे मनमाडमध्ये मोठी खळबळ उडाली असून ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, युनियन बँक मनमाड शाखेतील विमा प्रतिनिधीने बँकेच्या मुदत ठेवीदारांनी ठेवी भरण्यासाठी, नूतनीकरणासाठी दिलेल्या रक्कमेचा परस्पर अपहार (depositors of crores) केल्याचा प्रकार समोर आल्याने बँकेच्या मुदत ठेवीदारांचे चांगले दाबे दाणाणले आहेत.(Insurance representative duped depositors of crores)

विमा प्रतिनिधीकडून करोडोंचा अपहार
संतप्त ठेवीदाराने बँकेसमोर एकच गर्दी केली. सुभाष देशमुख असे अपहार करणाऱ्या विमा प्रतिनिधीचे नाव असून त्याने शेकडो मुदत ठेवीदारांकडून बँकेच्या मुदत ठेवी करण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी बेअरर चेक घेतले व स्वतःच्या नावावर परस्पर वटवून करोडो रुपयांचा अपहार केल्याचे ठेवीदारांचा आरोप आहे.

ठेवीदारांना पैसे परत देण्याची हमी
अपहाराची व्याप्ती पाहता बँकेने तातडीने चार जणांची चौकशी पथक नेमले असून त्यांच्या मार्फत या गैरव्यवहाराची चौकशी सुरु केली असून, ठेवीदारांना पैसे परत देण्याची हमी दिली जात आहे.बँकेमार्फत संबंधित विमा प्रतिनिधी विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे काम सुरु आहे.

टीम लय भारी

Recent Posts

सुजय विखेंचा रडीचा डाव !

डॉ. सुजय विखे पाटील (Dr.Sujay Vikhe Patil) यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय. पण पराभव स्विकारण्याची…

12 hours ago

महात्मा गांधी मु्स्लिमधार्जिणे होते का ? ( ज्येष्ठ पत्रकार रफिक मुल्ला यांचा लेख)

महात्मा गांधींजींशी संबंधित प्रसंग १ - हरिद्वारला कुंभमेळा भरला होता. महात्मा गांधी कुंभमेळ्याला ट्रेनने निघाले…

14 hours ago

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही…

1 week ago

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू (doctor's life) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…

1 week ago

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा (duped)…

1 week ago

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात…

1 week ago