Categories: क्राईम

पार्सलमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगून तरुणाला लाखोंचा गंडा

तुम्ही तैवान, थायलंड येथे पाठविलेल्या (कंन्साईंनमेंट) पार्सलमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला एमडी ड्रग्ज सापडले आहेत. पुढील कारवाई टाळण्यासाठी आम्ही दिलेल्या अकाउंटवर पैसे पाठवा, अन्यथा कठोर शिक्षेस तयार रहा’, असे धमकावत शहरातील ३१ वर्षीय तरुणाकडून १० लाख ४५ हजार रुपये उकळून (duped) फसविण्यात आले. याबाबत शहर सायबर पोलिसांत अनोळखी संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून अशा फसवणुका टाळण्यासाठी नागरिकांनी सायबर सजग राहणे गरजेचे असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. इंदिरानगरच्या चार्वाक चौकात राहणारा ३१ वर्षीय तरुण या फसवणुकीचा बळी ठरला आहे.(Man duped of lakhs of rupees by saying drugs were found in parcel)

त्याच्या फिर्यादीनुसार, तो २६ मार्च २०२४ रोजी कामात व्यस्त असतांना सायबर चोरट्यांनी ८१२५४३२०८३ या मोबाईल क्रमांकावरुन त्याला संपर्क साधला. त्याचवेळी सायबर चोरट्यांनी फेडेएक्स कुरिअर कस्टमर केअरचा सिनिअर एक्झक्युटिव्ह बोलत असल्याचे सांगून पाठविलेल्या एका कंन्साईनमेंटमध्ये मुंबई क्राईम ब्रान्च व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) पथकास एमडी ड्रग्ज, आधारकार्ड, कपडे, शूज सापडल्याचे सांगितले.

दरम्यान, मागील तीन ते चार महिन्यांत ३१ वर्षीय तरुणाने कुठेही कोणतेच कुरिअर वा पार्सल पाठविले नसल्याचे सांगितले. तरीही देखिल मोबाइलवरुन बोलणाऱ्या संशयिताने त्याला कठोर कारवाईची भिती घालून धमकावले. जर, एमडी ड्रग्जचे हे प्रकरण मिटवायचे असेल, तर एनसीबी व पोलिसांच्या 00000039575952162 (SBIN0011789) या क्रमांकाच्या बँक खात्यात १० लाख ४५ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. दरम्यान, या तरुणाने अधिक चौकशी केली, असता फसवणूक झाल्याचे समजताच त्याने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.

सायबर चोरट्यांनी नागरिकांना गंडा घालण्यासाठी अनेक नवीन शक्कल, ट्रिक्स लढविल्या आहेत. यात तुमचे मोबाईल सीम कार्ड दहशतवादी कारवायांसाठी वापरले आहे, असे सांगून कारवाईच्या नावाखाली धमकावून गंडा घातला जातो. तसेच तुम्ही कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशिर आर्थिक व्यवहार केले आहेत. त्यामुळे तुम्हाला अटक होईल, वाॅरंट बजाविले जाईल, असे सांगितले जाते. तर, तुम्ही केलेल्या कुरिअरमध्ये दहशवादाशी निगडित बाबी, पुरावे, तुमचे आधारकार्ड, पॅनकार्ड, एमडी ड्रग्ज, पिस्तूल सापडले आहेत. सीबीआय, एनसीबी, ईडी, क्राईम ब्रान्च तुमच्या घरी येऊन अटक करेन, कारवाई क्षीण करण्यासाठी सेटलमेंट करा, पैसे पाठवा असे म्हणूण फसवणूक केली जाते.

कोणतेही पोलीस दल, यंत्रणा नागरिकांना बँक खात्यात पैसे भरण्यास सांगत नाही. सायबर फसवणुकीचे वरील मुद्दे नव्याने समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी असे काही फोन काँल्स आले तर समोरच्या संशयितांना ब्लॉक करावे किंवा सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. कुणीही घाबरुन जाऊ नये. या माध्यमातून असे गुन्हे टाळता येतील.

टीम लय भारी

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

5 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

6 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

7 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

1 week ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

1 week ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

1 week ago