क्राईम

जुने नाशिकमध्ये दुकानांमध्ये भीषण आग ; ५० दुचाकींसह २ घरे जळून राख

जुने नाशिक मधील चौक मंडई येथील नुरी चौकात असलेल्या वाहन बाजार दुकानाला सोमवारी सकाळी (दि.२२) सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास भीषण आग ((Massive fire) लागली. क्षणार्धात आग वाऱ्यासारखी पसरल्याने शेजारील भंगरमालाची दोन दुकाने व या पाठीमागे असलेली दोन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशमन दलाच्या सुमारे २० जवानांनी नऊ बंबाच्या सहाय्याने शर्थीचे प्रयत्न करत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत सुदैवाने जीवित हानी टाळली असली तरी लाखोंच्या खों घरात आर्थिक नुकसान झाले आहे. नुरी चौकामध्ये उमर शेख यांचे महाराष्ट्र वाहन बाजार नावाने दुकान आहे. या दुकानात विक्रीसाठी सुमारे 50 पेक्षा जास्त दुचाकी ठेवलेल्या होत्या. (Massive fire breaks out at shops in Old Nashik Two houses, including 50 two-wheelers, burnt)

आगीची सुरुवात या दुकानातून सकाळी झाली. अग्निशमन दलाचा पहिला बंब शिंगाडा तलाव मुख्यालयातून घटनास्थळी पोहचला तेव्हा हे दुकान पूर्णपणे आगीमध्ये हरविले होते . असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. काही वेळेत या दुकानात अगदी लागून असलेल्या प्लॅस्टिक भांगर मालाच्या आदिल शेख यांच्या दुकानाला तसेच शोएब शेख यांचे अशरफी स्पेअर पार्ट नावाने असलेल्या दुकानाला आगीने कवेत घेतले. त्याचवेळी आग या दुकानांच्या पाठीमागे असलेल्या एजाज शेख व खैरुणीसा हनिफ सैय्यद यांच्या घरापर्यंत पोहचली. सुदैवाने घरातील लोकांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने जीवितहानी टळली. या सर्व दुकानांसह दोघा कुटुंबांचा संसार जळून राख झाला. यामुळे महिलांनी एकच आक्रोश केला. जहीर शेख यांच्याही घराचे काही प्रमाणात नुकसान झाले. स्थानिक युवकांनी धाव घेत मदतकार्य वेगाने केल्याने जवानांना आगीवर लवकर नियंत्रण मिळविता आले. आगीचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट होऊ शकलेले नाही. शॉर्टसर्किट व बॅटरीच्या स्फोटामुळे आग भडकल्याची चर्चा परिसरात रहिवाशांमध्ये सुरू होती.

नुरी चौकाचा हा संपूर्ण परिसर अत्यंत दाट लोकवस्ती व ऑटोमोबाइल, भांगरमालाची दुकाने, गेरेज, वेल्डिंगची दुकाने यांचा आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, केंद्र प्रमुख दत्तात्रय गाडे, लिडिंग फायरमन किशोर पाटील, संतोष आगलावे, राजेंद्र मोरे अनिल गांगुर्डे, घनश्याम इंफळ, प्रदीप बोरसे, प्रदीप परदेशी, इसहाक काझी, नाझीम देशमुख, गणेश गायधनी, शरद देटके, राजेंद्र खरजुल, बाळू पवार यांच्यासह प्रशिक्षणार्थी जवान यश वझरे उमेश सोनवणे यांनी शर्तीचे प्रयत्न करत चहूबाजूंनी पाण्याचा मारा करून आग विझवली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद झाली आहे .

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

12 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

12 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

13 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

13 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

14 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

16 hours ago