क्राईम

मुंबई पुन्हा हादरली ! लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीची हत्या

चर्नी रोड येथील वसतिगृहातील हत्याकांडानंतर मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. एका 32 वर्षीय महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे. लिव्ह-इन पार्टनरने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आहे. महाराष्ट्रातील मीरा रोड शहरात त्यांच्या भाड्याच्या निवासस्थानी ही घटना घडली आहे. या महिलेची दोन-तीन दिवसांपूर्वी हत्या झाली होती. आकाशदीप इमारतीच्या 7व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 704 मध्ये ही निर्घृण हत्या झाल्याचे सांगितले जात आहे.

काही शेजाऱ्यांनी बंद फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार करून पोलिसांना माहिती दिल्यानंतर सायंकाळी हा गुन्हा उघडकीस आला. नयानगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घर उघडले. तेथे त्यांना पीडितेचा मृतदेह सापडला. त्याचे अनेक तुकडे केले गेले होते. तसेच काही तुकडे गहाळ झाले किंवा त्याची विल्हेवाट लावली गेली. सरस्वती वैद्य (32) असे पीडित महिलेचे नाव आहे, ती तिच्या (56) वर्षीय साथीदार मनोज साने सोबत आकाशदीप इमारतीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये 3 वर्षांपासून राहत होते.

हे सुध्दा वाचा :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री ग्वाल्हेरवरून आले आणि सकाळी सकाळी कार्यक्रमाला नवी मुंबईत पोहचले

PWD च्या माध्यमातून होणारी कामे देशासाठी समर्पित असतात : मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबईत 19 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करुन हत्या; आरोपी सुरक्षारक्षकाने रेल्वेखाली केली आत्महत्या

मृतदेहाचे तुकडे करून आरोपी ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकायचा, ते उकळायचा आणि मग मिक्सरमध्ये बारीक करायचा. हे तुकडे तो पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या गटारात फेकून द्यायचा. यासाठी तो त्याच्या बाईकचा वापर करायचा. गुन्हा करण्यासाठी वापरलेलं साहित्य पोलिसांनी जप्त केले. या आरोपीवर कलम 302 आणि 201 हा गुन्हा दाखल करण्यात आला.

रसिका येरम

Recent Posts

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर फेकू नका, अशा प्रकारे करा वापर

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…

3 mins ago

ही काळ्या पिठाची पोळी खाल्याने लवकर वजन होणार कमी

पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…

34 mins ago

Eknath Shinde | Ajit Pawar | आताच्या राजकारणात लबाडी, पूर्वीचे राजकारण निष्ठेचे अने प्रामाणिकपणाचे

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…

2 hours ago

Eknath Shinde सातारचे, पण स्वत:चीच घरे भरतात | उदयनराजे १५ वर्षात आमच्या गावात आले नाहीत

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…

3 hours ago

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

16 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

17 hours ago