क्राईम

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू (doctor’s life) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. मृत्यूपूर्वी महिला डॉक्टर रात्री एक वाजेपर्यंत मित्रांसोबत पार्टी करत होती. डॉ. दीक्षा तिवारी असे मृत महिलेचे नाव आहे. मित्रांनीच दीक्षाला चौथ्या मजल्यावरून ढकलले, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर दीक्षाच्या मृत्यूचं (doctor’s life) कारण स्पष्ट होणार आहे.(Partying with friends till 1 am costs a woman doctor’s life)

डॉ. दीक्षा तिवारी ही बरेलीची राहाणरी होती. कानपूर मेडिकल कॉलेजमधून (GSVM Medical College) तिने एमबीबीएस पूर्ण केले होते. सन 2018-2022 बॅचची विद्यार्थिनी होती. कॉलेजच्या ऑडिटोरिएमच्या चौथ्या मजल्यावर पडून दीक्षाचा मृत्यू झाला. या घटने आधी दीक्षा तिच्या दोन बॅचमेट्ससोबत शहरातील रेस्तराँमध्ये पार्टी करत होती. त्यानंतर ती कॉलेजच्या ऑडिटोरिएम बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर आली होती. तिथून तोल जावून दीक्षाचा मृ्त्यू झाला. मात्र, दीक्षाच्या नातेवाईकांना या घटनेमागे घातपात असल्याचे म्हटले आहे. दीक्षाला मित्रांनी चौथ्या मजल्यावरून ढकलले, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

मेरठला झाली होती पोस्टिंग
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. दीक्षा तिवारी हिची पोस्टिंग मेरठला बरेली झाली होती. त्याआधी ती बुधवारी रात्री तिचे बॅचमेट हिमांशु आणि मयंकसोबत शहरातील एका रेस्तराँमध्ये पार्टी करण्यासाठी गेली होती. पार्टी झाल्यानंतर ती मेडिकल कॉलेजच्या ऑडिटोरियम बिल्डिंगमध्ये आली होती. त्यानंतर मध्यरात्री चौथ्या मजल्यावरून पडून दीक्षाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टरचे नातेवाईक बरेलीहून कानपूर येथे पोहोले आहेत.

माझ्या मुलीला वरतून खाली फेकले…
मृत डॉ.दीक्षा तिवारीच्य वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलीला चौथ्या मजल्यावरून खाली फेकण्यात आले आहे. तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

पोलिस काय म्हणाले?
डॉ. दीक्षा तिवारी यांच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. त्याआधी ती तिच्या दोन मित्रासोबत पार्टी करत होती. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली, अशी माहिती पोलिस आयुक्त हरिश्चंद् यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी डॉ. दीक्षाच्या मृत्यू प्रकरणी तिच्या दोन्ही मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

कॉलेज प्रशासनाने केला मोठा खुलासा
या प्रकरणी कानपूर मेडिकल कॉलेजने मोठा खुलासा केला आहे. डॉ.दीक्षा तिवारी आमच्या मेडिकल कॉलेजची 2018 बॅचची विद्यार्थिनी होती. सन 2023 मध्ये तिचे एमबीबीएस पूर्ण झाले होते. त्यानंतर तिने इंटर्नशिप केली मात्र, ती देखील संपली होती. ती रात्री दीडवाजेच्या सुमारात कॉलेज परिसरात कशी आली, याबाबत पोलिस तपास करत आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

आमचं सरकार आलं तर जरांगेंची मराठा आरक्षणची मागणी प्रथम पूर्ण करणार, जयंत पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का?…

4 days ago

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची स्ट्रॅटेजी तयार; देवेंद्र फडणवीस

राज्यात भाजपच्या आलेल्या कमी जागा ४८ पैकी ४५ हून अधिकचचा नारा देऊनही केवळ ९ जागांवर…

4 days ago

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही…

4 days ago

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा (duped)…

4 days ago

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात…

4 days ago

नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा दर परवडणारा नाही, त्यापेक्षा… शेतकरी काय म्हणाले?

उन्हाळ कांद्याचे ( onion) भाव कोसळल्यानंतर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्राने 'नाफेड' व 'एनसीसीएफ'या दोन…

4 days ago