Categories: क्राईम

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल, सरस्वतीनगर येथील बुथ क्र. 88 वर मतदान केंद्रावर मतदान रू असताना बुथसमोरील आठ ते दहा मतदारांच्या रांगेमधून सर्व मतदारांना ओलांडून बुथमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न एका कुटुंबाकडून करण्यात आला. यावेळी रांगेमध्ये येण्याची विनंती करीत असलेल्या केंद्र प्रमुखास धमकी (Polling station head threatened ) देत हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती, पत्नीसह मुलावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Polling station head threatened in Nashik; Husband, wife, son booked in Nashik)

अरूण सरदारसिंग परदेशी (60), अक्षय अरूण परदेशी (24, रा. फ्लॅट नंबर ओ २४, सुशिलनगरी, माने नगर, रासबिहारी रोड, म्हसरूळ) असे संशयितांची नावे असून, यात एका महिलेचा समावेश आहे. सरस्वती नगर येथील के के वाघ इंग्लिश स्कूल येथे मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असताना पती, पत्नीसह त्यांच्या मुलाने गोंधळ घातल्याची घटना घडली. मतदान केंद्र प्रमुखाशी अरेरावी करत ‘तु बाहेर ये, तुझ्या दोन थोबाडीत देतो. तु काम संपवून बाहेर ये मग तुझ्याकडे पाहतो, अशी धमकी मतदान केंद्र प्रमुखांना देण्यात आली.

पोलीस अधिकाऱ्यांनाही दिली धमकी
त्यानंतर केंद्र प्रमुखांनी ही बाब म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांना सांगितली. यानंतर काही पोलीस अधिकाऱ्यांनी पती, पत्नीस समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना पत्नीने पायातील चप्पल काढून पोलीस अधिकाऱ्यावर धावत जावून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांना शिवीगाळ केली. डीजी ऑफीसमध्ये माझे भाऊ आहेत. मी तुला त्यांच्यासमोर हजर करतो. तुला वर्दीची जास्त मस्ती आली आहे. मी तुझ्याकडे पाहून घेतो, अशी धमकी यावेळी पोलिसांना देण्यात आली.मी तुला त्यांच्यासमोर हजर करतो. तुला वर्दीची जास्त मस्ती आली आहे. मी तुझ्याकडे पाहून घेतो, अशी धमकी यावेळी पोलिसांना देण्यात आली.

म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
केंद्र प्रमुख पोलीस वाहनातून पोलीस ठाण्याला जाण्यासाठी निघून कॉलेजच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडून प्रकरण शांत होण्यासाठी काही काळ रस्त्याचे बाजूला थांबले असता पती, पत्नीने पुन्हा पोलिसांच्या वाहनाजवळ जात दरवाजा उघडून त्यास बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात सुहास विलास धारणे (49, रा. फ्लॅट नं ३, हर्षवर्धन सोसायटी, मखमलाबाद नाका) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

20 hours ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

20 hours ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

21 hours ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

7 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago