क्राईम

लाच घेताना मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात

5 हजारांची लाच (bribe) मागून 4 हजारांची लाच घेताना मुख्याध्यापिकेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( ACB ) रंगेहाथ पकडले आहे. श्रीमती अर्चना बापूराव जगताप (वय 39), पद -मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, अक्कलकोस तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे, (रा. अभिनव रो हाऊस क्रमांक 10 , गुलमोहर हाइट्स च्या मागे,मखमलाबाद रोड नाशिक) असे लाच (bribe) घेणाऱ्या महिलेचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांचे गट विमा योजनेचे देयक रुपये 1 लाख 33 हजार हे प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांनी मंजूर केले होते.(Principal caught in ACB net while accepting bribe)

या देयकाचे आहरण व संवितरण करण्याचे काम अर्चना जगताप यांच्याकडे होते. त्यामुळे तक्रारदार यांनी वेळोवेळी जगताप यांच्याकडे थकीत एकाकरिता पाठपुरावा केला. तेव्हा जगताप यांनी तक्रारदार यांच्याकडे सदरचे देयक मिळवून देण्यासाठी 5 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 4 हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. ही ला चेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरुद्ध दोंडाईचा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस
निरीक्षक रुपाली खांडवी, पो.ह. राजन कदम, संतोष पावरा, पो.शि. रामदास बारेला, प्रशांत बागुल, पो.ह. चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

6 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

6 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

6 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago