क्राईम

सराईत गुन्हेगारांच्या 6 मित्रांची ‘तडीपारी’! पोलीस उपायुक्त चव्हाण

गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तालयाकडून तडीपारीची (deported) कारवाई केली जाते. मात्र परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण (Chavan )) यांनी गुन्हे दाखल नसताना परंतु सराईत गुन्हेगारांसोबत वावरणाऱ्या ६ जणांना एका वर्षासाठी तडीपार (deported) करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांशी जवळीक ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.परिमंडळ एकअंतर्गत म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये २७ डिसेंबर रोजी सायंकाळी म्हसरुळ-आडगाव लिंकरोडवर मद्याच्या नशेमध्ये सराईत गुन्हेगार लुटमारीचे प्रकार करीत होते.(Six friends of convicted criminals ‘deported’! Deputy Commissioner of Police Chavan )

त्यावेळी त्याच रस्त्याने सेवानिवृत्ती लष्करी जवान रवीदत्त चौबे हे जात होते. त्यांनी संशयितांना हटकले असता, त्यावेळी संशयितांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यात चौबे यांच्या वर्मी घाव बसल्याने ते जागीच गतप्राण झाले होते. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे. मात्र, सदरची घटना घडण्यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांसमवेत त्यांचे सहा मित्र दारुपार्टी करीत होते. चौबे खुनप्रकरणात तिघांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली होती. परंतु त्यांच्या सहा मित्रांचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नव्हता. तसेच त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.चौबे खुनप्रकरणात तिघांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली होती. परंतु त्यांच्या सहा मित्रांचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नव्हता. तसेच त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही.

मात्र, त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य घडण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी त्या सहा जणांची एका वर्षासाठी शहर-जिल्ह्यातून तडीपारीचे (deported) आदेश जारी केले आहेत. त्यांच्या या कारवाईमुळे शहरातील सराईत गुन्हेगारांसोबत वावरणार्यांचे धाबे मात्र दणाणले आहे.

यांची केली तडीपारी
जय पंजाब मोहिते, उमेश सुरेश वाघ, प्रशांत उर्फ स्वप्निल तुकाराम डंबाळे, फिरोज सलिम शेख, रोहित गोटीराम बोराडे, जयशंकरसिंग देवेंद्रसिंग राजपूत

चार महिन्यात ५२ तडीपार
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी आयुक्तालय हद्दीतील सराईत गुन्हेगारांविरोधात धडक कारवाईची मोहिम सुरू केली आहे. त्याअंतर्गतच गेल्या जानेवारी ते आत्तापर्यंत आयुक्तालयातील परिमंडळ एकअंतर्गत ५२ सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीची (deported) कारवाई करण्यात आलेली आहे. सराईत गुन्हेगारांसमवेत राहून सामाजिक शांतता भंग करण्याची शक्यता गृहित धरून अशा गुन्हेगारांच्या मित्रांविरोधात यापुढे कडक धोरण अवलंबिले जाणार आहे. त्याअंतर्गतच सहा जणांना एका वर्षासाठी तडीपार (deported) करण्यात आलेले आहे.
किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त

टीम लय भारी

Recent Posts

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

2 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

2 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

2 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

2 hours ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

3 hours ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

15 hours ago