क्राईम

सांगलीत ऑल्टो कार कॅनॉलमध्ये कोसळली, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सांगलीच्या तासगाव मणेराजुरी मार्गावर मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये सहाजणांचा मृत्यू (killed) झाल्याची घटना समोर आली आहे. तर या दुर्घटनेत एकजण जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चिंचणी तासगाव – मणेराजुरी मार्गावर चिंचणी हद्दीत रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी ऑल्टो कार (Alto car Accident) थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. पाणी नसल्यामुळे हा कॅनॉल कोरडा होता. त्यामुळे वेगात असलेली ऑल्टो कार कॅनॉलमध्ये दणकन आदळली. या जबर धक्क्याने कारमधील सहा जण जागीच गतप्राण झाले. तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली आहे.(Six members of a family killed as Alto car plunges into canal in Sangli)

या दुर्घटनेतील सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगितले जाते. हे कुटुंब तासगावमधीलच होते. अपघाताच्यावेळी ऑल्टो कारमध्ये एकूण सात जण होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय तासगाववरून वाढदिवसासाठी कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते.
तेथून परतत असताना हा अपघात (Accident) झाला. चालकाच्या डोळ्यांवर झोप असल्याने त्याला डुलकी लागली असावी आणि कार थेट कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये ((killed)) तीन लहान बालकांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

रात्रीची वेळ असल्याने वेळेवर मदत मिळाली नाही जखमी अवस्थेत पहाटेपर्यंत पडून राहिले

या दुर्घटनेबद्दल मनाला वेदना देणारी आणखी माहिती समोर आली आहे. कार वेगात असल्यामुळे जोरात कोरड्या कॅनॉलमध्ये आदळली. यामध्ये कारचे बोनेट आणि पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. त्यामुळे गाडीत बसलेल्या लोकांना जबर मार लागला. हा अपघात झाला तेव्हा रात्रीचा दीड वाजला होता. त्यावेळी आजुबाजूला कोणीही नव्हते. परिणामी या कुटुंबाला वेळेत मदत मिळाली नाही. बुधवारी पहाटे एका व्यक्तीला हा प्रकार समजल्यानंतर त्याने आरडाओरड करत याची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वर्दी देत गावकऱ्यांनी बचावकार्य सुरु केले.

दुर्घटनेतील मृतांची नावे खालीलप्रमाणे

मयत नावे

राजेंद्र जगन्नाथ पाटील – वय 60

सुजाता राजेंद्र पाटील -वय 55

प्रियांका अवधूत खराडे वय 30 वर्ष (बुधगाव)

ध्रुवा- वय 3 वर्ष

कार्तिकी- वय 1 वर्ष

राजवी- वय 2 वर्ष

जखमी

स्वप्नाली विकास भोसले वय 30 वर्ष

टीम लय भारी

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

8 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

9 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

11 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

11 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

12 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

12 hours ago