क्राईम

चोरट्यांनी केला कहर; फ्रिजमध्ये लपविलेले दागिने केले लंपास

जगन्नाथपुरी येथे देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या बंगल्यात शिरुन चोरट्यांनी (Thieves)सोन्याचा राणीहार, पोत, मणी, जोडवे आणि वेल असे दागिने (Jewellery) लंपास केल्याची घटना पखालरोड परिसरात घडली. विशेष म्हणजे, ‘फ्रिज’ मध्ये दागिने लपविले असतानाही चोरट्यांनी ते शोधून काढत चोरुन नेले. याप्रकरणी १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध मुंबई नाका पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवला आहे.(Thieves wreak havoc; Jewellery hidden in fridge stolen)

याबाबत अधिक माहिती अशी की, वडाळागावातील (Wadalagaon) रहिवाशी नरेंद्र वनवे (वय ५४) यांनी मुंबई नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांची बहिणी अनिता देविदास पिंगळे यांच्या राहत्या बंगल्यात ही घरफोडी झाली. अनिता व देविदास हे दोघे ३ जून रोजी रात्री साडेबारा वाजता जगन्नाथ पुरी येथे देवदर्शनासाठी रवाना झाले. त्यानंतर ५ जून रोजी मध्यरात्री एक वाजता त्यांचे जावई आशुतोष लेंडे हे पुणे येथून नाशिकमध्ये (Nashik) विधी परीक्षेसाठी पोहोचले.
त्यांनी सासऱ्यांच्या घराचा मुख्य दरवाजा स्वता:कडील किल्लीने उघडला.

दरम्यान, त्यावेळी घरात चोरी झालाचा संशय आल्याने त्यांनी वनवे यांना कळविले. वनवे यांनी बंगल्याची पाहणी केल्यावर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक निसार शेख पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, गत महिन्यांत इंदिरानगर पोलिसांच्या हद्दीत एका घरफोडीत वॉशिंग मशिनमध्ये लपविलेले दागिने (Jewelry) चोरट्यांनी लंपास केले होते.

असा झाला उलगडा

३ जून रोजी पिंगळे दाम्पत्य जगन्नाथ पुरीला निघाले. त्यांचे जावई ५ जून रोजी मध्यरात्री १ वाजता बंगल्यात पोहोचले. त्यांनी मुख्य दरवाजा किल्लीने उघडला. तेव्हा घरातील सर्व सामान अस्ताव्यस्थ होते. कपाट आणि मागील दरवाजा उघडा होता. टेरेसवरील लोखंडी दरवाजाही उघडा होता. यासह तेथील भिंतीचा भाग तुटलेला दिसल्याने त्यांनी माम सासरे वनवे यांना कळविले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन बहिण अनिता हिला फोन केला. त्यांनी ‘फ्रिजरमध्ये दागिने ठेवलेत, ते आहे का बघ’, असे सांगितले. वनवे यांनी फ्रिजर बघितल्यावर तिथेही दागिने नव्हते.

एक इमारत, दोन घरफोड्या

आनंदवली येथील रिजेन्सी टॉवरमधील संजय अनंत मराठे यांच्या घराचा बंद दरवाजा तोडून चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिने लंपास केले. ९४ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी मराठे यांनी गंगापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. मराठे यांचे शेजारी महेश रामचंद्र लादे यांच्या घरातून सहा हजार रुपये रोख व चार पेनड्राइव्हसह आधारकार्ड, स्कूलबॅग चोरट्यांनी पळविली. गंगापूर पोलिसांनी एकत्रित घरफोडी नोंदवून तपास सुरु केला आहे.

टीम लय भारी

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

8 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

9 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

10 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

10 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

10 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

12 hours ago