क्राईम

पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या… वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी…पोलीस आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष..!

बांधकाम साइटवर शॉक लागून मृत्यू तर दुसरा एक गंभीर जखमी झाल्याचा प्रकार नुकताच इंदिरानगर भागात घडला. या घटनेची माहिती घेण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाकडून केबिनच्या आत मध्ये जाण्या अगोदरच अरेरावी तसेच अपमानास्पद वागणूक देण्यात आली. ही काय धर्मशाळा आहे का? माझ्या केबिनमध्ये कसे काय येतात. असे म्हणत माध्यम प्रतिनिधींचा अपमान करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या बदलीची मागणी पत्रकार संघाकडून करण्यात आलेली आहे. इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत इमारतीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून एका कामगाराचा हकनाक मृत्यू झाल्याच्या घटने संदर्भात माहिती घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधी भाई सोनार हे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्याकडे गेले. (Those who treat journalists with disrespect… Demand for transfer of senior police inspector… All eyes are on the role of the Police Commissioner..!)

तसेच पोलीस निरीक्षकाकडे जाण्यापूर्वी ठाणे अंमलदार तसेच संबंधित तपासी अंमलदाराकडे या घटनेची माहिती विचारली असता त्यांनी टाळाटाळ केली. तसेच संबंधित प्रकरणाबाबत वरिष्ठ निरीक्षकांना जाऊन विचारा असे सांगितले. यावेळी माध्यम प्रतिनिधी पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये पाय ठेवताच ही काय धर्मशाळा आहे का ? गेट आउट ! कोणीही येतं कोणीही जात ! अस म्हणत या घटनेची माहिती देण्यास टाळाटाळ करीत माध्यम प्रतिनिधींचा अपमान केला. पोलीस निरीक्षकाला एवढा राग येण्याचे कारण काय ? याचा अर्थ या प्रकरणात दाल मे कुछ काला है ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर बाब पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर पडताच पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. सदर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कार्यपद्धतीबाबत साशंकता निर्माण करून कारवाईची मागणी केली आहे. तर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक त्यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही. सदर घटनेबाबत पत्रकार संघ आक्रमक झाला असून पत्रकारांचा वारंवार अपमान करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची तात्काळ बदली करून कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भाचे निवेदन उद्या पत्रकार संघाचे पदाधिकारी पोलीस आयुक्त, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री भारतीय पवार व राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना देणार आहे.

एकीकडे पोलीस आयुक्त व पत्रकार यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण होत असताना दुसरीकडे कनिष्ठ पोलीस अधिकारी पत्रकारांना अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक देत असल्याचा प्रकार उघड झाल्याने सदर पोलिस निरीक्षकाच्या कार्यपद्धतीबाबत या निमित्ताने प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. या संदर्भात पोलीस आयुक्त नेमका काय निर्णय घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टीम लय भारी

Recent Posts

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole )…

39 mins ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

57 mins ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

3 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

4 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

4 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

4 hours ago