क्राईम

नाशकात खळबळ चक्क स्कुलबॅगमध्ये सापडले तीन चॉपर

गोदापार्क चिंचबन परिसरात एका अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या साध्या वेशातील पोलिस पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या स्कुल बॅगची झडती घेतली असता बॅगेत ३ चॉपर आढळून आले. तसेच घारपुरे घाट याठिकाणीही एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळील स्कुल बॅगमध्ये १ कोयता, २ चॉपर अशी घातक शस्त्रे मिळून आली आहेत गुप्ती, चॉपर मिरवणारा बालक ताब्यात – पंचवटी भागातील क्रांतीनगरमधील मनपा उद्यानाजवळ गुप्ती, चॉपरसारखे हत्यारे घेऊन मिरविणाऱ्या
विधीसंघर्षित बालकाला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्या अंगझडतीमध्ये १गुप्ती, २ चॉपर असे प्राणघातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.(Three choppers found in schoolbag )

नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सर्व पोलिस ठाणे प्रमुखांसह गुन्हे शाखा युनिट-१ व २ तसेच विशेष पथक, गुंडाविरोधी पथकांच्या प्रमुखांनाही हत्यारे बाळगणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार सर्व पोलिस ठाण्यांच्याा हद्दीत शस्त्रधारींविरीं रूद्ध धडक कारवाई मागील काही महिन्यांपासून सुरू करण्यात आली आहे. गेल्या पंधरवड्यापासून या कारवाईला अधिक वेग आला आहे. आगामी निवडणूका डोळ्यांपुढे ठेवून नाशिक शहर पोलिसांकडून कायदासुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांविरूद्ध मोर्चा उघडण्यात आला आहे. तडीपार, हद्दपार गुंडांसह शस्त्रे बाळगणाऱ्यांना ताब्यात घेत कारवाई केली जात आहे. जेणेकरून कोठेही कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही हा त्यामागील उद्देश असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सांगितले

गुंडाविरोधी पथकांच्या प्रमुखांनाही हत्यारे बाळगणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.यानुसार सर्व पोलिस ठाण्यांच्याा हद्दीत शस्त्रधारींविरीं रूद्ध धडक कारवाई मागील काही महिन्यांपासून सुरू करण्यात आली आहे. गेल्या पंधरवड्यापासून या कारवाईला अधिक वेग आला आहे. आगामी निवडणूका डोळ्यांपुढे ठेवून नाशिक शहर पोलिसांकडून कायदासुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांविरूद्ध मोर्चा उघडण्यात आला आहे. तडीपार, हद्दपार गुंडांसह शस्त्रे बाळगणाऱ्यांना ताब्यात घेत कारवाई केली जात आहे. जेणेकरून कोठेही कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही हा त्यामागील उद्देश असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सांगितले

नाशिक शहरात विविध उपनगरांमध्ये कोयते, तलवारी, चॉपरसारख्या हत्याराने हल्ले करण्यात आल्याच्या घटना मागील काही दिवसांमध्ये घडल्या होत्या. तसेच समाजकंटकांनी वाहनांचीसुद्धा अशाप्रकारे हत्यारांनी तोडफोड केल्याच्या काही घटना घडल्या होत्या. अशाप्रकारे दहशत माजविणाऱ्या समाजकंटकांना धडा शिकविण्यासाठी शहर पोलिसांनी विशेष मोहिम राबविण्यास सुरूवात केली

टीम लय भारी

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

14 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

14 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

15 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

15 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

15 hours ago

भाजपा – एनडीए 400 जागांचा टप्पा पार करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीत एनडीए 400 जागांचा टप्पा पार (NDA to cross 400-seat mark) करणार आणि ओडिशामध्ये…

16 hours ago