क्राईम

नाशिक जिल्ह्यातून परराज्यात कामासाठी गेलेल्या तिघांचा अपघातात मृत्यू

गुजरात राज्यातील बारडोली शहराजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मालट्रकचा झालेल्या भीषण अपघातात (accident) बागलाण तालुक्यातील खमताणे येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी आहेत. याबाबत अधिक माहिती आशिक की, डाळिंब छाटणी करण्यासाठी बागलाण तालुक्यातील खमताणे परिसरातील छाटणी कामगार विरगाव येथील भाजीपाला वाहतूक करणाऱ्या ट्रकवर सुरत येथे निघाले होते. बारडोली जवळ ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला.(Three killed in accident in Nashik district)

या अपघातात पिंटू पिराजी पवार (वय ४०, रा. खमताणे), सोनू एकनाथ मोरे (वय ३५, रा.खमताणे), भाऊसाहेब प्रताप बागुल (वय ५०, रा. खमताणे) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच बाबाजी कडू पवार, भाऊसाहेब हिरामण पवार, आकाश माळी, तुळशीराम सोनवणे (रा. तळवाडे), दादा केरसानेकर आदी गंभीर जखमी झाले असून त्यांना सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती घटनास्थळावर उपस्थित असलेल्या बागलाणमधील एका ट्रक चालकाने आमदार दिलीप बोरसे (MLA Dilip Borse) यांना देत मदतीची मागणी केली. त्यानंतर आमदार बोरसे यांनी तात्काळ बारडोली भाजप आमदार ईश्वरभाई परमार (MLA Ishwarbhai Parmar) यांच्याशी संपर्क साधून बागलाण तालुक्यातील अपघातग्रस्तांना मदत करण्याची विनंती केली. यानंतर आमदार परमार यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून जखमींना सुरत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर जखमींवर वेळीच उपचार झाल्याने त्यांचा जीव वाचला आहे.

टीम लय भारी

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

10 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

11 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

13 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

13 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

14 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

14 hours ago