क्राईम

डीजे वाहनाच्या धडकेत दोन शाळकरी मुले ठार

नाशिकमधील एकलहरे गावात मळे परिसरात पाण्याचा जार घेऊन जात असताना दुचाकी आणि डीजे वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन शाळकरी मुलं गंभीर जखमी झाली होती. त्यांच्यावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र अखेर या दोन्ही शाळकरी मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू (killed) झाल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दुचाकी आणि डिजे वाहनाचा अपघात झाला होता. एकलहरेला अखंड हरिनाम सप्ताहाला या दिवशी सुरूवात झाली. पिण्याच्या पाण्याचा जार किर्तांगळी गावातून घेऊन आगणमळा भागात शेती वस्तीकडे शाळकरी मुले मोटारसायकल वरुन जात होती. (Two school children killed in DJ vehicle collision )

त्यावेळी डीजे गाडी आणि त्यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला. त्यात पार्थ सोमनाथ चव्हाणके (वय १४) याचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर दुसरा अति गंभीर अभय नामदेव चव्हाणला (वय १४) उपचारासाठी पाठविण्यात आले. नाशिकला उपचार सुरू असताना उपचाादरम्यान मृत्यू झाला आहे. दोन्ही शाळकरी मुले वडांगळीच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात आठवीत शिकत होते. शेतकरी नामदेव चव्हाण यांचा एकुलता मुलगा आहे. अपघातात दोन्ही शेतकरी कुटुंबातील कष्टाळू मुलांचा मृत्यू झाल्याने एकलहरे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकलहरे परिसरात झालेल्या या अपघातात डीजे गाडी भरधाव वेगाने जात असताना हा अपघात घडला होता. यावेळी दुचाकीवरुन पाणी घेऊन जाणाऱ्या दोन शाळकरी मुलांना गंभीर दुखापत झाली होती. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर दुसरा हा गंभीर जखमी असल्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर गंभीर असलेल्या अभयचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या अपघातातील डीजे वाहन चालकाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून अधिक माहिती पोलीस घेत आहे. मात्र या अपघातामुळे परिसरातील कमी रुंदीचे रस्ते या अपघातांना कारणीभूत ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र आता स्थानिक प्रशासनावर नागरिकांकडून रोष व्यक्त केला जातो आहे. या अपघातात दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्यामुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

टीम लय भारी

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

11 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

12 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

12 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

13 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

13 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

15 hours ago