क्राईम

अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार:म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा

महिलेशी मैत्री केल्यानंतर तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा (Mhasrul police station)दाखल करण्यात आला आहे. महिलेशी मैत्री केल्यानंतर तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार(Woman Sexual assault) करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या परप्रांतीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल आहे.पीडितेस घरी नेऊन कोल्ड ड्रिंक्समधून गुंगीचे औषध दिले. तिची शुद्ध हरपल्यावर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नंतर शस्त्राचा धाक दाखवून घरच्यांसह मारून टाकण्याची धमकी दिली. तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढून पोलिसांत तक्रार केल्यास ते व्हायरल करण्याची धमकी दिली.(Woman sexually assaulted by threatening to make obscene photos and videos viral)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही म्हसरूळ परिसरात राहते. आरोपी विवेक यग्यनारायण बोहोरा (रा. करोलिया मार्ग, गीता भवन, बस्ती, जैतरण, जि. ब्यावर, राजस्थान) याचा या महिलेशी व्हॉट्सॲपद्वारे परिचय झाला. त्यानंतर आरोपी विवेक बोहोरा हा तिच्या घरी गेला. त्याने काही तरी गुंगी आणणारा पदार्थ पिण्यासाठी देऊन तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यादरम्यान त्या संबंधाचे व्हिडिओ व फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली, तसेच शिवीगाळ व मारहाण करून या महिलेवर पुणे, सोमेश्वर, मुंबई, गांधीनगर, चिलोडा व फिर्यादीच्या घरी वेळोवेळी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विवेक बोहोराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हाके करीत आहेत.

फिर्यादी महिला ही म्हसरूळ परिसरात राहते. आरोपी विवेक यग्यनारायण बोहोरा (रा. करोलिया मार्ग, गीता भवन, बस्ती, जैतरण, जि. ब्यावर, राजस्थान) याचा या महिलेशी व्हॉट्सॲपद्वारे परिचय झाला. त्यानंतर आरोपी विवेक बोहोरा हा तिच्या घरी गेला. त्याने काही तरी गुंगी आणणारा पदार्थ पिण्यासाठी देऊन तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यादरम्यान त्या संबंधाचे व्हिडिओ व फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली, तसेच शिवीगाळ व मारहाण करून या महिलेवर पुणे, सोमेश्वर, मुंबई, गांधीनगर, चिलोडा व फिर्यादीच्या घरी वेळोवेळी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विवेक बोहोराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हाके करीत आहेत.(गुन्हा रजिस्टर क्रमांक: ८१/२०२४)

टीम लय भारी

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

21 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago