क्राईम

नाशिकमध्ये कपडे खरेदीसाठी दुचाकीने जाताना डाव्या कालव्यात बुडून युवकाचा मृत्यू

नाशिकमध्ये अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी झालेल्या अपघातात बेपत्ता झालेला तरुण अखेर डाव्या कालव्याच्या ( left canal) पाण्यात सापडला आहे. कालव्याच्या बाजूने दुचाकीवरून दोघे जात असताना झालेल्या अपघातात मागे बसलेला दुचाकीस्वार थेट डाव्या कॅनॉलमध्ये पडला आणि कॅनॉलच्या पाण्यात वाहून गेला. अखेर त्याचा मृतदेह रविवारी (१४ एप्रिल) दुपारनंतर शोध मोहिमेतील पथकाला आढळून आला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून अमृतधामकडे जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेला सुजल वाळवंटे (वय २०) हा युवक थेट डाव्या कॅनॉलच्या पाटात पडून वाहून गेल्याची घटना शनिवारी (१३ एप्रिल) रात्री पावणे आठ वाजता घडली होती.(Youth drowns in left canal while riding bike to buy clothes in Nashik )

पाटाला आवर्तन सोडल्याने त्याला चांगल्या प्रमाणात पाणी होते. पोलिसआणि अग्निशामक दलाने त्याचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र तो सापडत नव्हता. रविवारी (१४ एप्रिल) रोजी त्याचा मृतदेह म्हसोबा मंदिराजवळ सापडला असून त्याचा पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

निलगिरी बाग वसाहतीत राहणारा सुजल मुंबई येथे नोकरीस होता. तो आई वडिलांना भेटण्यासाठी नाशिकला आला होता. शनिवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास तो त्याचा मित्र पुणेश सोमनाथ मुळे (वय १९) याच्यासोबत दुचाकीने (एम एच ४६ बी एम ६४०) निलगिरी बागेजवळच्या डाव्या कालव्यावरून अमृत धामकडे जात होता. त्यावेळी अचानकपणे दुचाकी घसरून दोघेही पडले. यात पुणेश रस्त्यावर पडला, तर सुजल हा कालव्यात पडला आणि पाटाच्या पाण्यात वाहून गेला. ही बाब काही सुज्ञ नागरिकांनी बघितली आणि तातडीने घटनेची माहिती पोलिस आणि अग्निशमन दलाला कळविली. अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी शनिवारी घटनास्थळी धाव घेत कालव्यामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत सुजलचा शोध लागू शकला नव्हता. दरम्यान, रविवारी दुपारी सुजल ज्या ठिकाणी पाण्यात पडलेला होता, त्याच ठिकाणी कपारीत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मित्र पुणेश हा देखील जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

कॅनॉलच्या परिसरांमधून होणारी वाहतूक अनेक दिवसांपासून सुरू आहे. कॅनॉलला पाणी सुरू असताना त्या परिसरात अनेक अपघात आणि गंभीर घटना घडत असतात. मात्र, प्रशासन त्याकडे कोणतंही लक्ष देत नसल्याची देखील तक्रार स्थानिकांनी केली. कॅनॉल परिसरातून दुचाकीस्वार जाताना अपघात घडून एकाचा पाण्यात वाहून जाऊन मृत्यू झाल्यामुळे पुन्हा एकदा कॅनॉल परिसरातील वाहतूक पाण्याचे आवर्तन सुरू असतानाच्या वेळेत बंद असावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.परिसरातील नागरिकांनी देखील आवर्तन सुरू असताना प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी पहारा देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मात्र, या गंभीर घटनेमुळे आता प्रशासन काय पावलं उचलणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. या घटनेनंतर नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टीम लय भारी

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

31 mins ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

54 mins ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

2 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

5 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

6 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

6 hours ago