संपादकीय

मुख्यमंत्र्यांकडून वाढदिवसानिमित्त काही अपेक्षा…

ऍड. विश्वास काश्यप

माजी पोलिस अधिकारी, मुंबई

महोदय,

परवा आपला वाढदिवस होता. खूप खूप शुभेच्छा साहेब आपल्याला.

बऱ्याच वर्षानंतर आपल्यासारखा शांत, संयमी, सद्गुणी, हुशार, मुत्सद्दी, मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. सुरूवातीच्या काळात ज्या शंकासुरांनी आपल्या संदर्भात ज्या शंका उपस्थित केल्या होत्या, त्या सगळ्यांना तुम्ही तुमच्या कर्तुत्वाने उत्तर दिले आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे काम करीत रहा. ९९ टक्के महाराष्ट्र आपल्यासोबत आहे. (महाराष्ट्रातील शहा फडणवीस प्रवृत्ती सोडून) (Some expectations from the Chief Minister on the occasion of his birthday).

साहेब डायरेक्ट मुद्द्यावर येतो. आपणास विनंती आहे की,  आपली मुंबई अतिशय गलिच्छ होत चालली आहे. मुंबई शहराला “शहर” म्हणावे असे आजकाल वाटतच नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर कसे पाहिजे हे आपल्याला चांगलेच माहित आहे.

मुख्यमंत्री होण्याअगोदर प्रत्येक उन्हाळी सुट्टीत जवळजवळ संपूर्ण जग आपण फिरून आलात. त्यामुळे बाहेरच्या देशासंदर्भात आपल्याला काही माहिती नाही असे थोडेच आहे ? आपण उत्कृष्ट फोटोग्राफर असल्याने आपली दृष्टी उत्तम आहे. चांगले वाईट इतरांपेक्षा आपल्याला लवकर दिसते, समजते. गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात आपला पक्ष सरकारमध्ये होता परंतु ते अनाजीपंत यांचे सरकार होते याची आम्हाला जाणीव आहे. परंतु आत्ताचे सरकार हे पूर्णपणे आपले “सरकार” आहे. त्यामुळे तसा कोणताच अडथळा नाही (The current government is completely our “government”).

साडेचार वर्षाच्या आयुषकडून उध्दव ठाकरेंना अनोखी सलामी

मी काय कुंद्रा आहे का?; असे का म्हणाले राज ठाकरे

साहेब,  मुंबई गलिच्छ होण्यामागे सगळ्यात जास्त कोणाचा हात असेल तर तो आहे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा आणि मंत्रालयातील नगरविकास खात्यातील अधिकाऱ्यांचा. या दोन्ही घटकांनी मिळून मुंबईचा सत्यानाश करून ठेवलेला आहे. मुंबईत कोणत्याही गल्लीत जा रस्त्यावर धडधडीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आपल्याला दिसेल. मन मानेल तसे अतिक्रमण केलेले पाहायला मिळते. संपूर्ण झोपडपट्टी, वस्ती, इमारतीचा काही भाग तोडायचा असेल तर त्यावेळी तेथील राजकीय नेतृत्व पुढे होऊन राजकारण करतात हे खरेच आहे. परंतु सुरुवातीची एक झोपडी बांधल्यानंतर संपूर्ण शंभर-दोनशे झोपड्या बांधेपर्यंत तुमचा बीएमसीचा वार्ड ऑफिसर, नगरविकास खात्यातील अधिकारी काय करीत असतो? फक्त नोटा मोजत असतात की काही ही लोक? तुमच्या बीएमसीचा आयएएस आयुक्त आणि नगरविकास खात्याचा आयएएस अधिकारी काय करतात? मुंबईच्या रस्त्यावर एसी गाडीतून फिरत असताना त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली असते का? की गाडीत पैसे मोजत असताना त्यांचे बाहेर रस्त्यावर लक्ष जात नाही? की मुंबईत फिरत असताना आयएएस मंडळींच्या घरासाठी नवीन सोसायटी तयार करण्यासाठी कुठे मोक्याचा भूखंड दिसतोय का यावर त्यांची नजर फिरत असते?

साहेब, तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. तुम्ही मुंबईच्या बाबतीत संवेदनशील आहात असे आम्ही समजतो. तुम्ही खर्‍या अर्थाने मुंबईकर मुख्यमंत्री आहात. तुम्ही सर्व समजू शकता. जोपर्यंत तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करीत नाही तोपर्यंत मुंबईच्या बरबादीचा नंगा नाच असाच चालू राहील. ही मंडळी फारच चलाख असतात. तुम्हाला एखादा भूखंड देऊन स्वतः डबल भूखंड हडप करतील. आतापर्यंत असेच झाले आहे. तेरी भी चूप मेरी भी चुप.

साहेब, मुंबईच्या प्रत्येक गल्यात अतिक्रमण झाले आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर दादरसारख्या ठिकाणी दोन इमारतींमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत दुकाने लांबच्या लांब तयार झालेली आहेत. रानडे रोड वरील प्रसिद्ध लसीचे दुकान दोन इमारतींच्या मधल्या मोकळ्या जागेत आहे. महिन्याचा लाखोचा धंदा आहे त्यांचा. काय करतो तुमचा तो बीएमसी जी नॉर्थ चा वॉर्ड ऑफिसर? त्याला एसी केबिनमध्ये बसून पैसे मोजायला बसवला आहे का?  हे फक्त एक उदाहरण आहे. अशी लाखो उदाहरणे आहेत.

कुठे जाहीर मुस्कटदाबी आणि कुठे सोबत घेतलेले दोन घास, चित्रा वाघ यांचे कुत्सित ट्विट

PM Modi, Mamata Banerjee Lead Birthday Wishes For Uddhav Thackeray

जे अधिकारी मुंबईच्या बजबजपुरीला जबाबदार आहेत ते करोडो रुपये कमवून हरी हरी करीत बसले आहेत. साहेब या अधिकाऱ्यांची वैयक्तिक संपत्ती तपासा. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची गावाकडील संपत्ती तपासा. या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाटते की, एका विभागातून त्यांची बदली झाली अथवा ते निवृत्त झाले तर त्यांची यातून जबाबदारी संपली. ते सुटले. परंतु यापुढे असे होता कामा नये. ज्याच्या कार्यकाळात ही अतिक्रमणे झाली आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. त्याची संपत्ती सरकार जमा करा. अहो साहेब,  लाखोंच्या घरात पगार आहे हो यांचा. तरी यांचा पोटाचा भस्मासुर वाढतच आहे. दोन चार आयएएस अधिकारी आणि शेकडो वॉर्ड ऑफिसर ऑर्थर रोड जेलमध्ये गेल्याशिवाय मुंबई सुधारणार नाही (Mumbai will not improve unless two or four IAS officers and hundreds of ward officers go to Arthur Road Jail).

प्रत्येक बेकायदेशीर ठिकाणी विद्युत वाहिनी चालू असल्याचे आम्हाला सूर्यप्रकाशापेक्षाही स्वछ दिसते. मग तो प्रकाश बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला दिसत नाही का? बेस्टच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना मी दोष देणारच नाही. सगळ्या भ्रष्टाचाराला हा वरीष्ठच जबाबदार असतो. वरिष्ठच भ्रष्ट असेल तर ती गंगा खाली वाहतच जाणार.

लाखोंच्या घरात पगार घेणारा दोषी की हजारात पगार घेणारा? तसे दोघेही दोषीच. परंतु आम्हां सर्वसामान्यांची बुद्धीची झेप किती तर ट्रॅफिकच्या हवालदाराने घेतलेल्या पन्नास रुपड्यांवर तो तावातावाने बोलणार. परंतु आयुक्त परमविरसिंग विरोधात काहीच बोलणार नाही. सर्वसाधारण बुद्धी, बाकी काय?

रस्त्यावरील फेरीवाले, बेकायदेशीर झोपडपट्ट्या, दुकाने यांना लाईट मिळतेच कशी?  या कामचुकारपणा आणि देशद्रोहाबद्दल या बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल का होत नाही? लाखोंचा पगार घेऊन हे अधिकारी कोणते कर्तव्य बजावत असतात?

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

साहेब,  परदेशातून आणि परराज्यातून येऊन मुंबईमध्ये रस्त्यावर कुठेही स्थायिक होण्याचा घटनात्मक अधिकार या घुसखोरांना कसा मिळू शकतो? आपल्या मुंबईला सुरक्षित ठेवायचे असेल तर अशा कर्तव्य न करणाऱ्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई आपण का करीत नाही? यांना फक्त कठोर शब्द वापरून आणि कारकुंडी लेखी नोटीस देऊन काहीही होणार नाही. त्या कारकुंडी नोटीसचा पेपर शौचालयाचा टिशू पेपर कसा करायचा याचा त्यांना चांगलाच अभ्यास आहे.

साहेब सगळ्यांनाच आज ना उद्या मरायचेच आहे. मृत्यू कोणालाही चुकला नाही. मृत्यूनंतर आपले नाव चांगल्या पद्धतीने पुढील कित्येक पिढ्यांना लक्षात राहावे म्हणून आपल्यासारख्या सज्जन राजकारण्याने उत्कृष्ट काम करायचे असते. पक्ष चालवताना पैसे लागतात. पैशाशिवाय काही नाही. हे सर्व माहीत असताना सुद्धा तुम्ही जर मुंबई शहरासाठी उत्तम काम केलेत तर मुंबईकर तुमचा पक्ष वर्षानुवर्ष जिवंत ठेवेल. तुमच्या आदित्यला, त्याच्या मुलाला ते सांभाळून ठेवतील. तुमचा सुद्धा एक भव्य पुतळा अभिमानाने उभा करतील. एक बाप म्हणून, ठाकरे कुटुंबप्रमुख म्हणून, एक राजकारणी म्हणून यापेक्षा तुमचे कोणते सर्वोच्च कर्तव्य असू शकते?

Uddhav has ability, will lead nation, says Shiv Sena MP Sanjay Raut

साहेब, आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये तुमचीच सत्ता येणार आहे. त्यासाठी तुम्ही कोणतीही स्ट्रॅटेजी तयार करू नका. फक्त तुम्ही मुंबई स्वच्छ करायला घ्या. रस्ते,  फुटपाथ चकाचक करा. बेकायदेशीर वस्त्या, इमारती, बांधकामे जमीनदोस्त करायला घ्या. संबंधित अधिकारी वॉर्ड ऑफिसरच्या बदल्या करा. दोषींवर गुन्हे दाखल करा.

साहेब, तुम्ही मुंबईला टाईट केले ना की त्याचा संदेश संपूर्ण राज्यात जाईल. त्यामुळे तुम्ही राज्याची चिंता करू नका.

मुंबईच्या या धोरणामध्ये मात्र राजकारणाचा विचार करू नका. एक सच्चा मुंबईकर मुख्यमंत्री म्हणून कामाला लागा. भूतकाळातील चुका आम्ही आपल्याला माफ करू. भविष्यामध्ये आपल्या हातून मुंबईची सेवा होवो. टक्केवारीचे प्रमाण शून्य करून मुंबई हे जगातील सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण शहर कराल या अपेक्षेसह आपल्याला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.

Rasika Jadhav

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago