संपादकीय

दिग्दर्शक बिमल रॉय यांनी गुलजार यांना गॅरेज मेकॅनिकल वरुन बनवले प्रसिध्द गीतकार

धनश्री धुरी :  टीम लय भारी

मुंबई : हिंदी सिनेमाचे प्रसिद्ध गीतकार आणि शायर गुलजार यांनी आजवर अनेक सुपरहिट गाण्यांचे बोल लिहिले आहेत. ‘तुझसे नाराज नही जिंदगी’, तेरे बिना जिया जाये ना, यारा सीली सीली यासारखी सुपरहिट गाण्यांचे बोल गुलजार यांनी लिहिले. परंतु गुलजार यांच्या करियरला मार्ग प्रसिद्ध निर्माते – दिग्दर्शक बिमल रॉय यांनी दाखवला (Famous producer-director Bimal Roy paved the way for Gulzar career).

गुलजार यांचे सुरूवातीचे जीवन फार संघर्षमय होते. ते नोकरीच्या शोधात अमृतसर वरून मुंबईला आले. मुंबईत त्यांनी एका गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम केले. गुलजार यांना लहानपणापासूनच कविता आणि शेरो- शायरी लिहिण्याची आवड होती. गॅरेजमध्ये काम करत असताना फावल्या वेळेत ते कविता लिहायचे. त्यांच्या गॅरेजच्या समोरच एक बुक स्टोअर होते. तिथे आठ आनेमध्ये दोन पुस्तके भाड्यावर मिळायची. गुलजार यांना तिथूनच पुस्तके वाचण्याची आवड निर्माण झाली.

रोहित पवारांकडून निर्मला सितारामण यांना वाढदिवसाच्या खोचक शुभेच्छा !

जाहीर सभा संपल्यावर ‘वंदे मातरम्’ बोलण्याची पद्धत ‘ह्या’ संगीतकारांनी केली सुरू

एकदा प्रसिद्ध निर्माते – दिग्दर्शक बिमल रॉय यांची गाडी खराब झाली होती. गाडी दुरुस्तीसाठी रॉय हे संयोगाने गुलजार ज्या गॅरेजमध्ये काम करत होते तिथे पोहचले. रॉय यांनी गॅरेजमध्ये गुलजार वाचत असलेली पुस्तके बघितली. रॉय यांनी पुस्तकांकडे बघत हे सर्व कोण वाचतो असा प्रश्न केला. यावर गुलजार यांनी ही सर्व पुस्तके आपण वाचत असल्याचे सांगितले (Gulzar said that he was reading all these books).

तिथून निघण्यापूर्वी रॉय यांनी गुलजार यांना आपल्या कार्यालयाचा पत्ता देत दुसऱ्या दिवशी भेटायला बोलवले. गुलजार बिमल रॉय यांच्या विषयी बोलताना आज ही भावूक होतात. ते म्हणतात ज्या वेळी मी रॉय यांच्या कार्यालयात पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा त्यांनी मला सांगितले की या पुढे तू कधीही गॅरेजमध्ये काम करायचे नाही.

शिल्पा शेट्टीचा सुपर डान्सरमध्ये कमबॅक

When Gulzar refused to write a song for AR Rahman at short notice: How poet-lyricist remains timeless

या पुढे गुलजार यांनी रॉय यांच्या अनेक चित्रपटांच्या गाण्यांचे बोल लिहीले आहेत. सन 1963 मध्ये ‘बंदिनी’ नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटाची सर्व गाणी शैलेंद्र यांनी लिहिली होती. यातील फक्त एकच गाणे गुलजार यांनी लिहिले होते. बंदिनी चित्रपटातील ‘मोरा गोरा अंग लेइ ले, मोहे श्याम रंग देइ देसे’ हे गाणे गुलजार यांनी लिहिले होते. या गाण्यापासूनच गुलजार यांचे नशीब खुलले होते (Gulzar fortune was revealed from this song).

गुलजार

गुलजार यांच्या जन्माची पार्श्वभूमी

गुलजार यांचा जन्म 18 ऑगस्ट 1934 साली पंजाबच्या दीना झेलम येथे झाला, जो आता पाकिस्तानचा भाग आहे. गुलजार यांचे पाळण्यातले नाव ‘सम्पूर्ण सिंह कालरा’ आहे. भारताच्या विभाजनानंतर गुलजार यांचे संपूर्ण कुटुंब पंजाबच्या अमृतसर येथे राहायला आले होते (After the partition of India, Gulzar entire family moved to Amritsar in Punjab).

बिमल रॉय

बिमल रॉय हे प्रसिद्ध दि्गदर्शक होते. त्यांनी हिंदी सिनेमातील सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. बंगाली आणि हिंदी भाषेत त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांनी परिणीता, बिराज, बहू, मधुमती, बंदिनी यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

13 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

13 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

14 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

14 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

15 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

16 hours ago