संपादकीय

5 ट्रिलियन अर्थव्यवस्था हे फक्त एक स्वप्नच, सीतारामण यांच्यामुळे देशावर महागाईचे ओझे

प्राची ओले : टीम लय भारी

मुंबई : आपला भारत देश मागील काही वर्षे आर्थिक संकटातून मार्गक्रमण करीत आहे. देशाचा जीडीपी खालावलेला आहे. वाढती महागाई लोकांचे खाण्या-पिण्याचे हाल करत आहे. पेट्रोल डिझेलचे गगनचुंबी वाढते भाव सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत आहे. या आधी तर सामन्य माणसांना कधी जीडीपी, जीएसटी हे शब्द देखील माहिती नव्हते. हे सगळे जनतेच्या कानी आले ते आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यामुळे (The burden of inflation on the country due to Sitharaman).

भारतासाठी प्रथम पूर्णवेळ संरक्षण तसेच अर्थमंत्री म्हणून पुर्ण वेळ कार्यभार सांभाळणाऱ्या ह्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत. पण जेव्हापासून त्या मोदी सरकारमध्ये मंत्री झाल्या आहेत तेव्हा पासून त्या टीकेच्या बळी पडत आहेत. गरिबांना फायदा होईल असे खूप कमी योजना त्यांनी काढल्या. त्यांच्या या पदामुळे श्रीमंत उद्योजकांनाच जास्त फायदा झालाय. 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न तर विसरा, ते फक्त ट्रॅक वर सुरळीत आणा. ते जरी यशस्वी झाले तरी बरे होईल.

रोहित पवारांकडून निर्मला सीतारामण यांना वाढदिवसाच्या खोचक शुभेच्छा !

राष्ट्रवादीने हाती घेतले ‘भगवे’ राजकारण, आमदार रोहित पवारांचा पुढाकार

निर्मला सीतारामण यांच्या पेक्षा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे एक उत्तम अर्थमंत्री होते. देशाच्या आर्थिक सुधारणेसाठी त्यांची नेहमीच स्तुती केली जाते. त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणेमुळे सेवा क्षेत्राचा विस्तार झाला (Economic reforms led to the expansion of the service sector).

भारतासाठी प्रथमच पूर्णवेळ संरक्षण तसेच अर्थमंत्री म्हणून पूर्ण वेळ कार्यभार सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामण ह्या पहिल्या महिला आहेत

पंतप्रधान असताना त्यांच्या मौनी स्वभावामुळे खूप लोकांनी ट्रोल जरी केले असेल, तरी त्यांना त्यांच्या अर्थ क्षेत्रातील कार्यामुळे त्यांचे कौतुक देखील झाले. ते पंतप्रधान होण्याच्या आधी 13 वर्षे अर्थमंत्री होते. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था 8-9% आर्थिक विकास दराने वाढवली. 2007 मध्ये त्यांनी भारताचा सर्वाधिक जीडीपी वाढीचा दर 9% इतका साध्य केला. आणि भारताची अर्थव्यवस्था ही जगातील दुसरी सर्वात वेगाने वाढवणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनवली. 2005 मध्ये त्यांनी जटिल व्हॅल टॅक्सच्या जागी व्हॅट कर लागू केला. त्याच वर्षी त्यांनी राष्ट्रीय रोजगार हमी योजना सादर केला. ग्रामीण मजुरांना रोजगार, उपजीविका, उदरनिर्वाह प्रदान केले. कामगार कायदा म्हणून ‘नरेगा’ पास करण्यात आला.

जितेंद्र आव्हाडांनी घेतली बैठक : तळीये मध्ये 261 घरे उभी राहणार

Congress retaliates against FM Nirmala Sitharaman’s ‘trickery’ charge on high fuel prices

4.5% असलेला जीडीपी दर त्यांनी 10.08% वर आणला. परंतु सीतारमण यांच्या कडून हे कधी साध्यच झाले नाही. 2019 मध्ये 6.52% जीडीपी होती. तर आता कोविडमुळे लॉकडाऊन झाला आणि भारताची अर्थव्यवस्था पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सीतारामणया आर्थिक मंदीचा चेहरा बनल्या आहेत. ई- सिगारेटच्या वादात त्यांच्या संभाव्य दुष्परिणामांवरील बंदीचा समावेश आहे. आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्य अर्थशास्त्रज्ञ शमिका रवी यांनीही अर्थव्यवस्थेच्या हाताळणीवर टीका केली होती. भारताला स्ट्रक्चरल मंदीचा सामना करावा लागत आहे. वाढीच्या धोरणाची गरज आहे.

सीतारामण यांच्या अर्थमंत्री म्हणून कार्यकाळात आर्थिक धोरणांचा आभाव आहे. भारतीय कंपन्याना अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी आणि परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कॉर्पोरेट कर कमी केला. सीएसआर (CSR) चा निर्णय रद्द केला आहे. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी व्यक्त केलेल्या चिंता फेटाळल्यानंतर, सीतारामण यांना अतिश्रीमंत अधिभार मागे घेऊन मदत जाहीर करण्यास भाग पाडण्यात आले.

Rasika Jadhav

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

9 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

9 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

10 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

11 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

13 hours ago