शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांना ‘कर्मवीर’ का बोलले जाते, जाणून घ्या

प्राची ओले : टीम लय भारी

राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा असणाऱ्या शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांच्या झोपडीपर्यंत शिक्षणगंगा पोहोचवली. लहानपणांपासूनच त्यांना  जातीभेदाची प्रचंड चीड होती. स्वतः कमी शिक्षण घेतले असले तरी, शिक्षणाबद्दल त्यांना प्रचंड आदर होता (Karmaveer Bhaurao Patil took Shikshanganga to bahujan’s hut).

चहाचा इतिहास ! चहा पिल्यामुळे टिळकांवर पडला होता बहिष्कार, गंगेत डुबकी मारून आले होते…

सुभेदार मल्हारराव होळकरांचे ऐकले असते तर पानिपत जिंकले असते

 

कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे बाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

राजर्षी शाहू महाराज हे तेव्हा कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते. समाजामध्ये त्यांनी समानतेचा झेंडा रोवला होता. त्यांच्या विचाराचा वारसा पुढे न्हेत कर्मवीर भाऊराव पाटलांनी 1932 मध्ये पुण्यात आईच्या स्मरणार्थ ‘युनियन बोर्डिंग’ ची स्थापना केली. शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागात पोहोचवण्याच्या हेतूने त्यांनी महात्मा फुले अध्यापक विद्यालय उघडले. ग्रामीण भागातील मुलांना वसतीगृहात आणून त्यांनी त्यांना पोटच्या मुलाप्रमाणे संभाळले. त्यांच्या पत्नीने देखील त्यांच्या कामात त्यांना हातभार लावला होता (Karmaveer Bhaurao Patil established ‘Union Boarding’ in pune in 1932 in memory of his mother).

रयत शिक्षण संस्थेचे आत्ताचे छायाचित्र

सुरुवातीचा काही काळ पाटलांनी शिकवण्या घेतल्या. दुधगावात काही सुशिक्षित लोकांच्या समावेत त्यांनी दुधगाव शिक्षण मंडळाची स्थापना केली. सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी वसतीगृह खुले केले. त्यातूनच पुढे रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. या शिक्षण संस्थेच्या मार्फत खेड्यापाड्यातील, सर्व जातीतील विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची दारे खुली झाली. 4 ऑक्टोंबर 1919 रोजी सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. मागास व गरीब मुलांना शिकता यावे यासाठी त्यांनी ‘कमवा आणि शिका’ ही योजना सुरु केली. आजच्या दिवसाला रयत शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे 675 शाखा आहेत. त्यांच्या रयत शिक्षण संस्थेचे चिन्ह हे वटवृक्ष आहे. ह्याचा अर्थ की वटवृक्षाप्रमाणे ह्या शिक्षणसंस्थेची शाखा वाढत जावो. या संस्थेचे ब्रीदवाक्य ‘स्वावलंबी शिक्षण’ असे ठेवण्यात आले कारण, ह्या शिक्षण संस्थेतील वसतिगृहात राहणारी मुले, ही स्वतः काम करतात. रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील क्रमांक एकची शिक्षण संस्था आहे. 1924 मध्ये साताऱ्यात त्यांनी राजश्री शाहू महाराजांच्या नावाने वसतीगृह खुले केले. गांधीजींनी देखील त्यांच्या वसतीगृहाला भेट दिली होती (Karmaveer Bhaurao Patil founded rayat shikshan sansthan).

शिक्षणाबद्दल प्रचंड आवड, गरीब आणि अनाथ मुलांबद्दल मनात दया, समाजात चांगले बदल व्हावे ह्या साठीची धडपड आणि चिकाटी असलेले हे प्रभावी व्यक्तिमत्व होते. भाऊराव पाटील यांना पुणे विद्यापीठाने ‘डिलीट’ ही पदवी दिली. शिक्षणातील त्यांच्या अमुलाग्र कार्यासाठी त्यांना जनतेने ‘कर्मवीर’ ही पदवी बहाल केली. राष्ट्रपतींकडून ‘पद्मभूषण’ हा किताब मिळाला होता. प्रेमाने जनता त्यांना अण्णा असे बोलत असे (Karmaveer Bhaurao Patil was conferred the title ‘Karmaveer’ by the people for his outstanding work in education).

‘ते माझे मार्गदर्शक…’ असे बोलून आर्याने दिला अफेअर अफवांना पूर्णविराम

Maharashtra NCP Chief Seeks Bharat Ratna For Karmaveer Bhaurao Patil

महाराष्ट्रात सर्वदूर भागात शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या भाऊराव पाटील ह्यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार बहाल करावा अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.

वैष्णवी वाडेकर

Share
Published by
वैष्णवी वाडेकर

Recent Posts

पोपट सोबत असल्यास भविष्यवाणीला महत्व…; उमेश पाटील

मुंबईत लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. प्रचार करण्यासाठी अवघे दोन दिवस हातात…

10 mins ago

गटतट,वाद विवाद संपवून एकत्रित समाजासाठी लढा – मराठा आंदोलक नाना बच्छाव

काल दि १६ रोजी सकल मराठा समाजावतीने जाहीर लोकसभेतील वाजे, भगरे पाठिंबा पत्रानंतर त्या निर्णयाचे…

39 mins ago

तरूणाईच्या मनात कोण ?, नरेंद्र मोदी की विरोधक ?

लय भाराची टीम गेले काही दिवस नाशिक मतदार संघातील मतदारांचा आढावा घेत आहे(Who is in…

1 hour ago

कन्नमवारनगर समस्यांच्या जंजाळात, नागरिकांची लोकसभा उमेदवारांकडे याचना

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दीना पाटील, तर भाजपकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…

2 hours ago

संजय राऊतांच्या ‘त्या’ आरोपानंतर निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून तपासणी : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका…

3 hours ago

नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची असणारी परिस्थितीबाबत मनपाचा कानाडोळा

घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…

3 hours ago