संपादकीय

राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा गुंता वाढला

  • अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची निवड प्रकरणाचा चेंडू (politics) आता केंद्र सरकार तसेच न्यायालय यांच्या कोर्टात गेल्याने या निवड प्रक्रियेत आता गुंता वाढला आहे.

राज्य सरकारने राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याकडे पाठवून आता महिना लोटला तरी त्यावर काहीही हालचाल झालेली नाही. राज्यपाल हे अपेक्षित प्रतिसाद देत नाहीत हे पाहून याबाबत काही जणांनी या बाबत न्यायालयात धाव घेतली आहे. या 12 जणांच्या यादीतील काही व्यक्तींच्या नावाला राज्यपाल कोशियारी यांचा आक्षेप असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. तसेच नेहमीच उद्धव ठाकरे यांना व्यक्तिगत विरोध अशी भूमिका राज्यपाल कोशियारी यांच्या अनेक वर्तनातून दिसली आहे.

ही यादी त्वरित मंजूर करण्यासाठी राज्यपाल कोशियारी यांना निर्देश द्यावेत यासाठी काही जण उच्च न्यायालयात गेले आहेत , तर सामाजिक कार्यकर्ते दिलीप आगळे आणि शिवाजी पाटील यांनी न्यायालयात याचिका सादर करून या यादीतील काही नावाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राज्यपाल नियुक्त 12 आमदारां बाबत संविधानाच्या 171 (3) (इ)या कलमानाव्ये नियुक्ती प्रक्रियेत अस्पष्टता आहे असे या याचिका कर्त्यांचे म्हणणे आहे. याबाबत युक्तिवाद एकूण उच्च न्यायालयाने आता ऑटर्नि जनरलला नोटीस बजावली आहे. आणि या प्रश्नी कायद्यातील या अस्पष्टता आणि राज्यपाल तसेच राज्य मंत्रिमंडळाचे अधिकार याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता या विषयात केंद्र सरकारची उडी पडली आहे. केंद्र सरकार कडून लवकरच या विषयी न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले जाण्याची शक्यता आहे.

सध्या तरी केंद्र सरकार आणि न्यायालय या दरम्यान ही 12 राज्यपाल नियुक्त नावे अडकली आहेत. राज्यांची अडवणूक करण्याचे केंद्राचे धोरण आता या प्रश्नी काय भूमिका घेते हे महत्वाचे आहे.

दरम्यान अलीकडेच भाजपातून राष्ट्रवादी मध्ये आलेले एकनाथ खडसे यांचे नाव या यादीत असून या नावाला कोशियारी यांचा विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी ने आपले अजून योग्य पुनर्वसन केले नसल्याची खंत खडसे यांनी अलीकडेच मी अजून एकटाच सामान्य कार्यकर्ता असल्याचे विधान करून अप्रत्यक्षपणे व्यक्त केली आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

मशरूम खाण्याचे फायदे

मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…

24 mins ago

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

1 hour ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

2 hours ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

3 hours ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

3 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

4 hours ago