संपादकीय

क्रिकेट : छोडो कलकी बातें कलकी बात पुरानी ! (अभय गोवेकर)

अभय गोवेकर, क्रिकेट तज्ज्ञ 

भारतीय क्रिकेट संघाचा नवीन प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रवीडने प्रशिक्षण कार्याचा कार्यभार स्वीकारून स्वत:च्या प्रशासन कार्यास आरंभ केला. न्यूझीलंड संघाचा भारत दौरा सुरू झाला आहे. त्यापूर्वी द्रविडने संघ निवडीच्या आधी सर्व संभाव्य खेळाडुंना एकत्रीत आणून त्यांच्या समवेत एका चर्चासत्राचे आयोजन करुन विचारांची देवाण-घेवाण केली होती. (Rahul Dravid is the new head coach of the Indian cricket team)

न्युझीलंडच्या भारत दौऱ्यात पहिल्या कसोटी सामन्यासाठी अजिंक्य रहाणेच्या गळ्यात संघनायकाची वरमाला घालून पांच दिवस चालणाऱ्या स्वयंवराच्या मंडपात उभे करण्यात येणार आहे. रोहीत शर्मास कसोटी मालिकेच्या दरम्यान त्याचा शारीरीक, मानसिक, बौद्धिक, व्यावसायिक, व्यवहारीक, आर्थिक परिस्थीतीचा गुढ गृहपाठ तसेच वेळेचा सदुपयोग करण्यासाठी विश्रांती दिली जाईल.

डेविड वॉर्नरला मिळालेल्या ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ किताबावर, शोएब अख्तरची नाराजी

शाहीद आफ्रिदीने जावयाला सुनावले खडेबोल, पाकिस्तानचा पराभव शाहीन आफ्रिदीमुळेच

नोव्हेंबर २५ पासून कानपूर येथे पहिल्या कसोटी सामन्याची सुरुवात होईल. विराट कोहलीस विश्रांती घेण्यास निवड समिती सदस्य सांगत आहे. बोर्डाचा डॅाक्टर सांगत नाही. माथेफिरु चौकडी राहाणेस दुसऱ्या कसोटीतही नेतृत्व करण्सास सांगतील.

तुगलखी विचारांनी थैमान घातल्यास कदाचित ‘तेरे व्दार खडा एक जोगी’ म्हणून पुन्हा अफाट जो कुणासही सपाट करण्याची क्षमता राखतो त्या विराट कोहलीस काटेरी मुकुट चढवून कप्तान करुन मैदानात उतरवतील. कर्णधारपदाचा निर्णय घेण्यापूर्वी दीर्घकाळ चर्चेच्या फैरी झाडल्या गेल्या यातून तात्पुरता मार्ग काढला गेला.

राहुल द्रविड

Australia vs Pakistan: 24 वर्षानंतर पहिल्यांदाच कांगारू जाणार पाकिस्तानच्या दौऱ्यावर, तिन्ही प्रकारच्या सामन्यांचं वेळापत्रक जाहीर

Tim Paine: The Fallen Captain Once Hailed Australian Cricket Saviour

कार्याचा आताच ताबा घेतलेला प्रशिक्षक द्रवीड आपल्या जुन्या ‘राजस्थान रॉयल संघातील रहाणेस ज्याने त्याला घडविले त्यालाच झुकते माप देणार यात शंकाच नाही. तात्पुरता मार्ग काढून अन्याय दूर केला. प्रोत्साहीत करण्याचा द्रवीडने प्रयत्न केलेला आहे. यापूर्वी राहाणे कर्णधार, उपकर्णधारही होता. परंतु संघ निवडताना त्यालाच प्रथम संघाबाहेर काढले जाते अशी त्याची थट्टा अनेकदा केलेली आहे व तो यात अनुभवीही आहे.

सोम्या-गोम्यांचा निवड समितीने जसप्रीत बुमराह – मोहम्मद शमी – ठाकूर व पंत या चार खेळाडूंची कायमस्वरुपी निवड केलेली आहे असे पत्रकारांना सांगीतले. ‘कही पे निगाहें कहींपे निशाना’ हे गाणे एकाच तालासुरात राग हादरा व घबराट मिश्रीत संगीतबध्द केलेले काव्य नाटकी सदस्यांनी गात भारतीय कसोटी संघाची विमा काढून निवड केली. यश मिळाले तर ते आमच्यामुळे, पराभव अपयशाचे मानकरी मग तुम्ही अशा जमाखर्चावरच.

रोहित शर्मा आणि विराट कोहली

१. शुभमन गील  २. मयंक अगरवाल  ३. लोकेश राहुल असे तीन आघाडीवीर फलंदाज उपकर्णधाराचे नांव तुघलख मंडळीने जाहीर केलेले नाही. राहुल या शर्यतीत आहे. शिवाय तो अत्यंत उपयुक्त यष्टीरक्षकही आहे व त्याने ते सिध्दही करुन दाखविलेले आहे.

उपकर्णधाररही एक निवड समिती सदस्य असतो यांचाही विसर पडलेला दिसत आहे. सौरभ गांगुलीने आजचा संघाचा प्रशिक्षक राहुल द्रवीडवर यष्टीरक्षणाची जबाबदारी टाकून संघात एका जादा अष्टपैलू गोलंदाजाची निवड केलेली होती हे गांगुली व द्रवीड आज सोईस्कररित्या विसरले आहेत का ?  इतिहासाची पाने चाळून संबंध-संदर्भ जरुर घेण्यात यावा.

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शम्मी

भारताचा मधल्या फळीत ४. पुजारा ५. राहाणे ६. अय्यर यांचा समावेश असेल. पण रहाणेच्या फॉर्मचे काय ? अष्टपैलू ७. जडेजा ८. अश्विन सोबत ९. अक्षर पटेल १०. जयंत यादव या ओव्हर स्पीन गोलंदाजास संधी दिली गेली आहे. .

भारतीय नियामक मंडळाच्या राष्ट्रीय निवड समितीने आजवर ही प्रथा पाडून त्याचे वर्षानुवर्षे अनुकरणच केलेले आहे. पोती भरली जातील एकेक नावाची नोंद करणे शक्य होणार नाही. परंतु अनेकांचे क्रिकेट मधील भविष्य त्यांच्या जीवनाशी खेळून असा निवड समिती सदस्यांनी राखरांगोळी केलेली आहे. झाली ते मात्र म्हणत होते ‘ जिंदगी उसीकी है ! वो किसीका हो गया क्रिकेटमे ही जल गया !

इशांत शर्मा आणि उमेश यादव

जलदगती गोलंदाज ११. इशांत शर्मा, १२. उमेश यादव, १३. नवोदीत सिराज, ४ था गोलंदाज प्रसिध्द कृष्णावर कोणत्या सदस्यांचा अतिविश्वास आहे म्हणून त्याची निवड केलेली आहे ?

इंग्लंड-ऑस्ट्रलिया देशांच्या राष्ट्रीय संघात त्यांची निवड होण्यापूर्वी-करण्यापूर्वी त्यांच्या क्रिकेट हंगामात कौंटी क्रिकेट मधील त्याची प्रत्येक सामन्यातील कामगिरी – प्रगतीची नोंद तेथे चढत्या आलेखाची आवश्यकता असते. प्रत्येक कौंटी खेळणारा खेळाडू परिपक्व झाल्यास अग्निपरीक्षेस उत्तीर्ण झाल्यावरच त्याची राष्ट्रीय संघात निवड होते. त्यावेळीच त्याच्या वयाची पंचविशी त्याने गाठलेली असते.

साऱ्या विश्वातील खेळाडू तेव्हा निवृत्ती घेतात. तेव्हा इंग्लंडचे जेफ बॉयकॉट,डेटेक अंडरवूड,टे इंनिंगवोर्थ सारखे पन्नाशी कडे झुकलेले खेळाडू ऐन बहरात असतात तेथे निवृत्ती वयाचे बंधन नाही. नजर-हात-पाय नीट चालत  असतील हातून भरीव कामगिरी होत असेल तर ते अंतर्मनाचे ऐकून निर्णय घेतात.

आपल्याकडे सध्या कदाचित फसवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या रणजी आणि दुलिप करंडकाचा राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन बोर्ड स्वतः देशभरच्या स्तरावर करते. आपल्या वाट्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळाडू आपल्या जीवाचे रान करतात. यात एकदा का देशाचे प्रतिनिधित्व केले कि नावलौकिक झालेले खेळाडू या स्पर्धांकडे पाठ फिरवतात.

तरुण-होतकरू-उदयोन्मुख खेळाडूंना या कसोटी या क्रिकेटवीरांसमोर बोलण्याची-भेटायची-खेळण्याची साधी संधीही मिळत नाही. प्रत्येक टप्प्याच्या संघात देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आजही आहेत ते त्यांची जबाबदारी ओळखून प्रतिकूल परिस्थितींचा सामना करून खेळीतील चमक दाखवतात पण तेव्हा राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य त्यांची कामगिरी पाहण्यास स्टेडियममध्ये उपस्थितीत असतात का ? नाही म्हणतात तेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है याने कुणाचे कसे भले होईल?

टी-ट्वेंटीचा सामना २० षटके अर्थात २० गुणुले =१२० चेंडूचा  प्रत्येक सामना फलंदाज व फलंदाजीस पोषक अश्या वातावरणाची केलेली निर्मिती चौकट-षटकांची आतषबाजी पाहावयास मिळावी म्हणून कमी केलेली सीमा-त्याची अंतर प्रत्येक गोलंदाजास ४ षटके टाकण्याचा परवाना अर्थात २४ चेंडू २० षटकात-१२०चेंडूने संपूर्ण १० फलंदाज बाद करण्याचे आव्हान यातून देशाचा राष्ट्रीय संघ निवडणे व तेही पाच दिवसांच्या कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी.

देशाचे मंडळ त्यांची नियुक्ती केलेली निवड समिती हे एकत्रित येऊन संयुक्त विद्यमाने भारतीय क्रिकेट खेळाडू यांची क्रूर-चेष्टा-थट्टा करीत आहेत का !प्रेक्षकवर्ग/जाणते आजी-माजी खेळाडू जनताजनार्दनालाही हे मूर्खच समजतात का! जनतेस एवढेच वाटते कि “सुरज ना बदला चांद ना बदला ना बदला आसमान कितना बदल गया इन्सान “

खेळाडूंच्या निवडी संबंधीही मंडळावर पर्यायाने निवड समिती सदस्यांवरही जाहिराती कंपनीचा दबाव येऊ शकतो.आजची ही सत्य परिस्थिती आहे, कटू सत्य आहे आजवर कुणासही माहीत नाही ज्ञात नाही विषय कधीही अगदी चुकून सुद्धा चर्चिला गेलेला नाही.

एखाद्या खेळाडूचा जाहिरातीसाठी जर वापर करण्यात आलेला असेल व त्यातून त्यांचा आर्थिक नफा घेत असेल मग त्याची खेळातील कामगिरी समाधानकारक असो किंवा नसो त्याला संघातून वगळू नये यासाठी वस्तू उत्पादन करणारी कंपनी त्यांची जाहिरात करुन  घेणारी एजन्सी ही मंडळी दबाव आणून आपला कार्यभाग साधू शकतात. जनता जनार्दन-प्रेक्षक-शुभचिंतक यांनी मात्र म्हणावे युॅतो हमने लाख हॅंसी देखे है तुमसा नही देखा

राहुल द्रविडने प्रत्येक खेळाडुंशी व्यक्तिक संवाद साधून त्यांची मानसिक तयारी करुन घेतलेली आहे. पुढील वर्षी डिसेंबर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाईल. काही ठरावीक खेळाडूंचा वापर पुढील ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या T-20 विश्वचषक कपसाठी केला जाईल. निवड समिती सदस्यांनाही द्रविडने विश्वासात घेतलेले आहे.

लेखक म्हणून या सर्वांना हे एकच सांगावे वाटते की, “सजन रे झुठ मत बोलो, खुदाके पास जाना है न हाथी है न घोडा है वहॉं पैदल ही जाना है.

(लेखक नामवंत क्रिकेट समिक्षक आहेत)

कीर्ती घाग

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago