संपादकीय

पुंडलिक विठ्ठलाला वीट फेकून का मारतो? हे माहिती आहे का?

मृगा वर्तक

सत्यवती व जानुदेव नावाच्या जोडप्याला एक पुंडलिक नावाचा पुत्र होता. लग्न झाल्यानंतर तो आपल्या आई वडिलांशी वाईट वागू लागला. एके दिवशी या त्रासाला वैतागून त्याचे आईबाबा तीर्थक्षेत्री जाण्यासाठी निघतात. तेव्हा पुंडलिकाची पत्नीही त्यास घेऊन त्यांच्यासोबत जाते. वाटेत एक कुकुट्टश्रम लागतो तेथे दोन दिवसांची विश्रांती घेण्यासाठी सगळेच  थांबतात (Why does Pundalik kill Vitthala by throwing bricks).

भल्या पहाटे तिथे अत्यंत मालिन अवस्थेतील काही स्त्रिया येतात व आश्रमाची स्वच्छता करून स्वामींचे कपडे धुवून जातात. पुंडलिक त्यांना ओळख विचारतो तेव्हा त्या आपली ओळख गंगा, यमुना आणि सरस्वती अशी सांगतात. आपला चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे आपण कसे मलिन झालो हे त्या तिघी पुंडलिकाला सांगतात. लोकसेवेचे महत्त्व पटवून देतात. पुंडलिक मनोमन खजील होतो व आपल्या आई बापाची सेवा करण्याचे व्रत धरतो. आणि त्यांच्या सेवेत तो इतका गढून जातो की त्याला विश्वाचा विसर पडतो.

विठ्ठला मुख्यमंत्र्यांनी जशी तुझी भेट घेतली तशी एकदा जनतेची पण भेट घेउदे हीच तुझ्या चरणी प्रार्थना

लोटांगण घातले असते; अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना खोचक टोला

एके ठिकाणी भगवान विष्णू आपल्या दास दासी आणि गोपिकांसोबत बसलेले असतात. तेव्हा रुक्मिणी रागाने उठून निघून जाते. आपल्या प्रिय राखुमाईच्या विरहाने विष्णू संपूर्ण पृथ्वीतलावर तिच्या शोधार्थ निघतात. सरतेशेवटी ते चंद्रभागेच्या तिरी येतात. तिथे त्यांना पुंडलिक आपल्या माता पित्याची सेवा करीत असलेला दिसतो (Pundalik is seen serving his parents).

त्याची मातृभक्ती आणि पितृभक्ती पाहून भगवान पुंडलिकाची भेटण्यास वेळ मागतात. आई वडिलांच्या सेवेत गढून गेलेला पुंडलिक चिडून त्यांना वीट फेकून मारतो. म्हणतो पाहू किती वाट पाहू शकता. विष्णू मग त्या विटेवरच उभे ठाकतात. कमरेवर हात देऊन पुंडलिकाची वाट पाहू लागतात. तेव्हापासून त्यांना विठ्ठल असे नाव प्राप्त होते.

आषाढी एकादशीचे महत्त्व

आषाढ महिन्यातील या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या दिवसापासून कार्तिकी एकादशी पर्यंत चार महिने चातुर्मास चालू होतो. हे चार महिने प्रभू गाढ निद्रा घेत असतात. म्हणून या दिवसाला देव शयनी एकादशी असेही म्हणतात.

निद्रा घेणे म्हणजे काय? ‘मी’ हीन शरीराची जागृत अवस्था. या काळात आपल्या ‘अहंभावास’ समाधी लागू द्यावी आणि जागृत अवस्थेत काम करावे.

पंढरपुरात पोहचताच मुख्यमंत्र्यांनी घेतली कोरोना संदर्भात बैठक

On ‘Ashadhi Ekadashi’, Uddhav Thackeray Prays For End Of COVID-19 Crisis

याबद्दलची पौराणिक कथा अशी आहे की, साऱ्या विश्वाचा व्याप सांभाळून विष्णू थकून जातात, आणि आपल्या भक्तांना तुम्ही वाट्टेल ते करा असे सुचवून चिरनिद्रा घेतात. चातुर्मास संपल्यानंतर जेव्हा उठून ते आपल्या भक्तांची प्रगती पाहतात तेव्हा कौतुक करतात. भक्त म्हणतात, भगवान, तुम्ही होता म्हणून ही समृद्धी,  हे सुख लाभले. भगवान म्हणतात,  मुळीच नाही, मी तर निद्रा घेत होतो. झालेल्या कामाचे श्रेय घेण्यास दोघेही नकार देतात. यालाच निराहम कामगिरी म्हणतात. अहं बाजूस सारून फक्त कर्म करीत राहावे. हे मी केले, हे माझे आहे असे म्हणू नये, फळाची अपेक्षा ठेऊन काम करू नये अशी शिकवण या कथेतून दिलेली आहे.

आपल्यातील अहं ला समाधी लावणे फार कठीण काम असते. मीपणाला निद्रिस्त अवस्थेत ठेऊन, जागृत अवस्थेत इतरांची, या विश्वाची, जगाची सेवा करणे करणे म्हणजे चातुर्मास पाळणे होय.

विठ्ठल-रुक्मिणी

विठ्ठल माऊली, रखुमाई व पुंडलिक यांच्या अनेक कथा आहेत. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी मान्यता मिळालेल्या अनेक गोष्टी आहेत,  त्यापैकी तुम्हाला आणखी काही गोष्टी माहिती असतील तर त्या सुद्धा खर्याच आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीत मौखिक पद्धतीने कथा पुढील पिढीकडे पाठवताना त्यात अनेक सकारात्मक, संस्कार व बदल घडले जातात किंवा जाणीवपूर्वक घडवले जातात. ते आपल्या फायद्याच्याच दृष्टीने पाहावे. भक्ताची वाट पाहणाऱ्या विठू माउलीला नमन करून तिची शिकवण आत्मसात करावी.

Rasika Jadhav

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

6 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

7 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

8 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

8 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

9 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

9 hours ago