एज्युकेशन

‘या’ आजारावर मातकरून क्रिशने दहावीत घेतले ९० टक्के गुण!

टीम लय भारी

मुंबई : ख-याखु-या जीवनातही कधीकधी सिनेमासारख्या  घटना घडतात. पण त्यासाठी चमत्कार नव्हे, तर सुयोग्य मार्गदर्शन कामी येतं. असाच एक प्रकार घडला आहे मुलुंडच्या क्रिश शिरीष शाह या मुलाबाबतीत. अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसाॅर्डर (एडीएचडी- एकाग्रतेचा अभाव आणि अतिचंचलता समस्या) आणि बिहेव्हिअरल इश्यूज (वर्तवणूक समस्या) यांमुळे क्रिश जेव्हा पहिली-दुसरीत होता, तेव्हा त्याला अक्षरं समजत नव्हती. बोलताना तो अडखळायचा. पण आज तोच क्रिश आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांनी उत्तीर्ण झाला आहे. वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन पुढे त्याला एमबीए व्हायचं आहे.

जाहिरात

मुलुंडच्या एनईएस नॅशनल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असलेल्या क्रिशचं वर्गात लक्ष नसायचं. वर्गमित्रांमध्ये मिसळणं त्याला जमत नव्हतं. अभ्यास तर दूरची गोष्ट. सुरुवातीला शिक्षकांनी दुर्लक्ष केलं, पण तिसरीत गेल्यावरही सुधारणा होत नाही, म्हणून शिक्षकांनी पालकांकडे तक्रार करायला सुरुवात केली. शाळा क्रिशला काढून टाकण्याच्या प्रयत्नात होती. क्रिशची आई कोमल शाह यांनी चाइल्ड लर्निंग सेंटरचे संस्थापक डाॅ. सुमित शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि क्रिशला नियमित समुपदेशन, थेरपी सुरु केली. पाचवी, सहावी, सातवी अशी तीन सलग वर्षं आॅक्युपेशनल थेरपिस्ट असलेल्या डाॅ. सुमित शिंदे यांनी अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसाॅर्डर आणि वर्तवणूक समस्यांच्या (बिहेव्हिअरल इश्यूज) संदर्भात क्रिशला समुपदेशन केलं. “क्रिश आठवीत येईपर्यंत त्याची वर्तवणूक समस्या दूर झाली. तो वर्गमित्रांमध्ये मिसळू लागला. त्याची शैक्षणिक कामगिरी सुधारली. ज्या विषयात उत्तीर्ण व्हायला त्याला अडचण यायची, त्या गणितासारख्या विषयात तो चांगले गुण मिळवू लागला”, अशी माहिती क्रिशची आई कोमल शाह यांनी दिली. नुकत्याच लागलेल्या आयसीएससई दहावीच्या निकालात क्रिशला ९० टक्के गुण मिळाले, तेव्हा त्याच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

जाहिरात

वर्तवणूक समस्या तसंच अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसाॅर्डरमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर फेकले जातात. याविषयी सांगताना ‘चाइल्ड लर्निंग सेंटर’चे डाॅ. सुमित शिंदे म्हणाले, “कोणत्याही प्रकारच्या डेव्हलपमेंटल इश्यूजमुळे किंवा लर्निंग डिसॅबिलिटीमुळे जर मुलांना अडचणी येत असतील, तर पालकांनी त्या वेळीच ओळखायला हव्यात. लहान वयातच अशा मुलांना जर योग्य समुपदेशन, मार्गदर्शन आणि उपचारपद्धती उपलब्ध झाल्या आणि पालकांनीही जर मुलांकडे विशेष लक्ष दिलं, तर वर्तवणूक समस्याग्रस्त मुलंही इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावू शकतात.”

जाहिरात
राजीक खान

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

7 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

8 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

9 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

9 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

9 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

11 hours ago