एज्युकेशन

नाशिक जिल्ह्यात कारसुळची शाळा बनली जील्ह्याची शान

कारसूळ हे कादवा व काजळी (नेत्रावती) ह्या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले छोटेसे गाव आहे. या गावाची लोकसंख्या २६०० असून, येथे वैकुंठवासी ह.भ.प.श्री. संत सदगुरु मल्हारी बाबा व वैकुंठवाशी ह.भ.प. पोपटबाबा महाराज या संतच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी पिंपळगाव बसवंतपासून ८ किमी, तर निफाड तालुक्याच्या गावापासून १५ किमी अंतरवर आहे. या गावातील पारंपरिक व्यावसाय शेती असून, कांदा, ऊस, टोमॅटो व द्राक्ष ही पिके घेतली जातात. या गावातील द्राक्ष युरोप व रशियासह अन्य देशात पाठविले जातात.गाव शेतीत अग्रगण्यभागी आहे. तसेच, गावाच्या विकासात पण पुढे आहे‌. गावात भूमिगत गटारी, कॉंक्रीटीकरण, सोलर, स्ट्रीट लाईट, शासकीय इमारतीवर सोलर, शौचालय उभारणी, जलशुद्धीकरण प्रकल्प, शासकीय इमारतीवरील, रेनवॉटर हार्वेस्टिंग आदी विकासत्मक कामांवर भर देत यात शैक्षणिक कार्यावर अधिकाधिक भर दिला आहे.

इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रामपंचायत, गावकरी व शिक्षकांच्या मदतीने तसेच सीएसआर, वैयक्तिक व संस्थांच्या मध्यामातून नावारुपाला आणले आहे. या शाळेला आय.एस.ओ. व आतंरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व मानांकन प्राप्त आहे. तसेच, नव्याने पंतप्रधान स्कूल फॉर रायझिंग इंडिया (पीएमश्री) यात कारसूळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा नंबर आला आहे. याशाळेत अनेक घटकांचे एकूण २२३ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध शालेय, सहशालेय उपक्रम राबविले जातात. यात क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, टॅबवर शिक्षण, अध्ययनात ई – लर्निगचा वापर, संगणक चालवणे, cursive writting १ ते ७ वीचे विद्यार्थी छान करतात.

क्रीडा प्रकारात खोखो, कबड्डी, भालाफेक, थाळी फेक, बुद्धिबळ स्पर्धा, कॅरम असे विविध खेळात विद्यार्थी नैपुण्य मिळवत आहेत. तालुक, जिल्हा स्तरापर्यन्त पोहोचले आहेत. चित्रकला, गायन, नृत्य, वक्तृत्व, सूत्रसंचालन करणे, यात विद्यार्थी निपुण होत आहे. भविष्य वेधी शिक्षणासाठी भविष्यात कोडिंग,वैदिक गणित, ॲबॅकस, कराटे प्रशिक्षण देणे, परसबागेत विविध भाजीपाला लागवड , वृक्षारोपण करणे.असे विविध उपक्रम प्रस्तावित आहेत.

शाळेत सुसज्ज संगणक कक्ष, वाचनालय ,जिम , स्वच्छतागृह,या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशा सर्व सुविधांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो आहे. या वर्षांपासून ३ ते ६ च्या मुलांसाठी ज्युनिअर, सिनिअर केजीचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र वर्ग खोली तयार केली आहे.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी गावात मोठे ग्रंथालय उभारणे , मोठ्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करणे.एक घर एक औषधी झाड उपक्रम, कचरा व्यवस्थापन ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती व खतनिर्मिती करणे.स्थानिक पिकांवर आधारित लघुउद्योग जसे टोमॅटो सॉस निर्मिती, बेदाणा, मनुका निर्मिती. वाईन प्रकल्प इत्यादी, ग्रामीण पर्यटन स्थळे, नदीकाठी ग्रामीण हाँटेल संस्कृती विकसित करून तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणे.आधुनिक शेतीसाठी शेतकर्यांचे अभ्यास दौरे परदेशात काढणे.गावात किमान ११वी १२ वी पर्यंत शिक्षण उपलब्ध करून देणे. व्यसनमुक्ती, तरूणांना व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ लोकांचे व्याख्यान आयोजित करणे, असे उपक्रम प्रस्तावित आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

ओव्हेरियन सिस्टच्या समस्येपासून सुटका हवी? मग दररोज करा ही 5 योगासने

सध्या महिलांचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. यातच आता कित्येक महिलांमध्ये ओव्हेरियन सिस्टची समस्या झपाट्याने…

3 hours ago

या योगासनांच्या मदतीने थायरॉईडमधील TSH पातळी होणार नियंत्रित

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना खूप कमी वयातच थायरॉईड या आजाराने…

4 hours ago

चमकदार त्वचा हवी? तर अशा प्रकारे करा गिलॉयचा वापर

स्त्री असो व पुरुष सर्वांचा आपला चेहरा चमकदार हवा. मात्र, चेहरा नेहमी चमकत राहणं शक्य…

7 hours ago

Devendra Fadanvis | सातारा भाजपमध्ये निष्ठावंत विरूद्ध उपरे | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घमासान |

भारतीय जनता पक्ष आता कॉंग्रेसमय झालेला आहे(Bharatiya Janata Party has now become Congress). भाजपमध्ये निष्ठावंतांना…

8 hours ago

काळ्या आणि जाड भुवयांसाठी करा ‘या’ तेलांचा वापर

कोणाला सुंदर आणि जाड भुवया असाव्यात असे कोणाला वाटत नाही? परंतु, सुंदर भुवया मिळविण्यासाठी, त्यांना…

9 hours ago

टूथपेस्ट ऐवजी बेकिंग सोड्याने करा ब्रश, मोत्यासारखे चमकतील दात

डोसा, इडली आणि ढोकळा अशा अनेक पदार्थ बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो.पण, तुम्हाला माहिती आहे…

9 hours ago