एज्युकेशन

MPSC exam : एमपीएससीच्या प्रलंबित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

टीम लय भारी

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शालेय, माध्यमिक आणि इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा लांबणीवर टाकाव्या लागल्या आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या नियोजित असलेल्या परीक्षाही कोरोनामुळे लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. आता हळुहळू लॉकडाऊन हटवण्यास सुरुवात झाल्यानंतर आता एमपीएससीकडून प्रलंबित परीक्षांचे वेळापत्रक (MPSC exam schedule announced) बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या वेळापत्रकाप्रमाणे राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही १३ सप्टेंबर २०२० रोजी होईल. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० ही ११ ऑक्टोबर २०२० रोजी होईल. तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही परीक्षा एक नोव्हेंबर २०२० रोजी घेण्यात येईल.

दरम्यान, आज वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असले तरी, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत शासनाकडून वेळोवेळी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि लॉकडाऊनचा कालावधी विचारात घेऊन एमपीएससीकडून वेळोवेळी फेरआढावा घेण्यात येईल, तसेच यासंदर्भातील माहिती एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, त्यासाठी परीक्षार्थींनी संकेतस्थळावरून नियमितपणे माहिती घ्यावी, असे आवाहन एमपीएससीकडून करण्यात आले आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

राहूल गांधींचे काय चुकले ? | दलित समाजाने सांगितली मनुवादी कारस्थाने

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…

13 hours ago

माण – खटावची तरूणी बारामतीत शिक्षण घेते | माण – खटाव व बारामतीमधील फरक तिने समजून सांगितला

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…

13 hours ago

Ladaki Bahin Yojana | भाजपच्या लाडक्या बहिणीने सरकारची केली पोलखोल | लाडक्या आमदारालाही खोटे ठरवले

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…

14 hours ago

Jaykuamar Gore Vs Prabhakar Deshmukh | शाळकरी मुलांनी सांगितले आमदाराचे कार्य

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…

15 hours ago

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असणं नामुष्की | शिंदे, अजितदादा तमासगीर | बाळासाहेब पाटील एक नंबर आमदार

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…

15 hours ago

Jaykumar Gore | लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत, आमदाराने पाणी आणले नाही

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…

17 hours ago