एज्युकेशन

School reopen : मुलांना शाळेत पाठवायचे की नाही; पालकांमध्ये भीती व संभ्रम

टीम लय भारी

मुंबई : चारशेहुन अधिक शिक्षकांना कोरोनाची (Corona) बाधा झाल्याने मुलांना शाळेत (School reopen) पाठवायचे की नाही, असा प्रश्न पालकांना पडला आहे. तसेच विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Parents are wondering whether to send their children to school because of the coronation of teachers.)

संस्थाचालकांचा शाळा सुरू करण्यासंदर्भात नकार आहे. बहुतांश पालकसुद्धा मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. शाळांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात सोयी-सुविधांचा अभाव आहे. प्रशासन साहित्य पुरवायला तयार नाही. आता शिक्षण विभागानेही हात वर केले आहेत.

शाळेत शिकवायला जाणा-या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यात अनेक ठिकाणी शिक्षकच कोरोनाबाधित आढळल्याने एकूणच शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक पातळीवर मोठा संभ्रम आहे. (There is a lot of confusion at the local level about starting a school.)

शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई, ठाणे, पुणे वगळता राज्यात सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र विदर्भात सर्वाधिक २०० शिक्षक बाधित आढळले आहेत. मराठवाड्यात ९७, खान्देशात २३ तर पश्चिम महाराष्ट्रात १३२ शिक्षक बाधित आढळले आहेत. विशेष म्हणजे मुंबईत डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी चाचण्यांमध्ये एकही शिक्षक कोरोनाबाधित आढळलेला नाही.

दरम्यान, शाळेत प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची ‘थर्मल स्कॅनिंग’ करायची आहे. केवळ ‘थर्मल स्कॅनिंग’ने कोरोना डिटेक्ट होईल का, असाही सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

अभिषेक सावंत

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

1 week ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

1 week ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

1 week ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

2 weeks ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago