Categories: मनोरंजन

अनन्या पांडेची आज तिसऱ्यांदा चौकशी होणार; NCB ने बजावले समन्स

टीम लय भारी

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिला मुंबई क्रूझ पार्टी ड्रग्ज प्रकरणात आज पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश अमली पदार्थ नियंत्रण विभागाने दिले आहेत. याच प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. अनन्याची आज तिसऱ्यांदा चौकशी होणार आहे(Ananya Pandey third inquiry from NCB)

गेल्या गुरुवारी अनन्याला पहिल्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी दोन तास तिची चौकशी करण्यात आली. तिच्याकडचे दोन मोबाइल आणि तिचा लॅपटॉपही एनसीबीने ताब्यात घेतला. त्यानंतर चौकशीची दुसरी फेरी शुक्रवारी झाली. त्यावेळी साधारणतः चार तास तिची चौकशी करण्यात आली. मात्र या चौकशीत काहीही ठोस पुरावे आढळले नसल्याने तिला सोमवारी म्हणजे आज पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीने बजावले समन्स

आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड कारागृहात

अनन्या आणि आर्यन या दोघांमधले ड्रग्जच्या संदर्भातले चॅट्स समोर आल्यानंतर तिला पहिल्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं. हे दोघेही गांजाबद्दल चर्चा करत होते. एनसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन अनन्याला गांजाविषयी विचारत होता. ती गांजा मिळवण्यासाठी काही ‘जुगाड’ करू शकते का? असंही त्याने तिला विचारलं. त्यावर ‘मी तुला ते मिळवून देईन’ असं उत्तर अनन्याने दिलं.

अनन्या पांडे

एनसीबीच्या तपास अधिकाऱ्यांनी जेव्हा हे चॅट अनन्याला दाखवून त्याविषयी तिला विचारलं, त्यावेळी आपण केवळ थट्टा करत असल्याचं तिने अधिकारऱ्यांना सांगितलं. या चॅट्सशिवाय अनन्याने आर्यनला ड्रग्ज पुरवले याविषयीचे कोणतेही पुरावे एनसीबीच्या हाती लागलेले नाहीत. गुरुवारी झालेल्या चौकशीदरम्यान अनन्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की तिने आत्तापर्यंत कधीही ड्रग्ज घेतलेले नाहीत आणि आर्यनसोबतचे हे चॅट्स साधारण एका वर्षापूर्वीचे आहेत, त्यामुळे तिला याबद्दल अधिक काही आठवत नाही. ती म्हणाली की गांजा हा अमली पदार्थ असतो हे तिला माहिती नव्हतं अशीही माहिती समोर आली होती.

आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नवाब मलिकांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Mumbai cruise drugs case: Ananya Pandey summoned by NCB again today

Mruga Vartak

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago