मनोरंजन

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली मालिका म्हणजे कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal). २०१८ साली ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर बाळूमामांच्या (balumama’s unseen story)  जीवनावर आधारित असलेली ही मालिका सुरू झाली होती. खूप कमी कालावधीत ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली. या मालिकेचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे.(‘Balimamachya navan changbhal’ balumama’s unseen story to unfold in balumama’s memory)

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’  या लोकप्रिय मालिकेत आजवर आपण बाळूमामांना वेगवेगळ्या रूपात पाहिले आहे. रसिकांनी बाळूमामांचे लहान वयातील रूप आणि तरूण वयातील रूप पाहिले आणि त्यांच्या उतार वयाच्या टप्प्यावरचे रूप ही अनुभवले. या सर्व रूपात प्रेक्षकांनी बाळूमामावर भरभरून प्रेमही केले आहे. आता प्रेक्षकांना बाळूमामांच्या आयुष्याच्या आठवणीतील आणि भूतकाळातील अशा काही गोष्टी बघायला मिळणार आहेत ज्या आत्तापर्यंत आपल्याला कोणालाच माहीत नव्हत्या.

उतारवयाच्या या टप्प्यावर बाळूमामांना जाणीव व्हायला लागली की, आपण एवढा प्रवास केला लोकांसाठी राबलो, आयुष्यात अनेक लोक आली आणि गेली. आता आपण एकटे पडलो आणि ह्या सगळ्या आठवणींनीमुळे मामा रडायला लागले . मामांचे गुरु मुळे महाराज त्यांनी भेटून त्यांचे सांत्वन केले आणि मग त्या दोघांचा एकत्र प्रवास सुरु होतो. प्रवास करत असताना अक्कोळ गावाजवळ ते आले त्यांना काही माणसे भेटली आणि गावात येण्याची विनंती केली. त्यांनतर मामांना इथून पुढे भूतकाळाचे काही प्रसंग दिसू लागतात. भूतकाळामध्ये गेल्यावर त्यांना छोट्या मामांच्या आयुष्यातील पुढची कथा उलगडायला सुरु होते. जसे चंदूलालचा लोभीपणा,आईचा खाष्टपणा आणि प्रेमळ बायकोची मामावर असलेली माया आपल्याला पाहायला मिळेल.

मामांच्या अशा अनेक चमत्कारिक प्रसंगाची मालिका सुरू होणार असून ती लवकरच प्रेक्षकांसमोर नव्या रूपाने सादर होणार आहे. बाळूमामांच्या चरित्रगाथेत या कथेच्या निमित्ताने समर्थ पाटील ज्याने बालपर्वातील बाळुमामाची लोकप्रिय भूमिका साकार केली होती. तो मालिकेमध्ये पुनरागमन करणार आहे. अष्टपैलू अभिनेते प्रकाश धोत्रे बाळूमामांची मुख्य भूमिका साकारत आहेत. या नव्या टप्प्यावर सुद्धा बाळूमामांच्या अनाकलनीय आणि अवाक करणाऱ्या चरित्रातील अनेक न पाहिलेले प्रसंग रसिकांना पहायला मिळतील.

तेव्हा चुकवू नका बाळूमामांच्या आठवणीतला नवा अवतार. येत्या २० तारखेपासून ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं ‘  दररोज रात्री ७:३० वाजता फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

टीम लय भारी

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

8 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

9 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

10 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

11 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

12 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

13 hours ago